धानाची बोनस रक्कम शेतकरी व अभिकर्ता संस्थांकडे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:34 AM2021-09-10T04:34:25+5:302021-09-10T04:34:25+5:30

सद्य:स्थितीत खरीप व रबी हंगामातील धान खरेदीची संपूर्ण रक्कम अभिकर्ता संस्थांकडे वर्ग करण्यात आली आहे. अन्न नागरी पुरवठामंत्री छगन ...

Grain bonus amount to farmers and agent organizations | धानाची बोनस रक्कम शेतकरी व अभिकर्ता संस्थांकडे वर्ग

धानाची बोनस रक्कम शेतकरी व अभिकर्ता संस्थांकडे वर्ग

googlenewsNext

सद्य:स्थितीत खरीप व रबी हंगामातील धान खरेदीची संपूर्ण रक्कम अभिकर्ता संस्थांकडे वर्ग करण्यात आली आहे. अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी माजी अर्थमंत्री तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांना पत्र पाठवून ही माहिती कळविली आहे. खरीप व रबी हंगाम २०२०- २१ मधील धानाच्या प्रतीनुसार शेतकऱ्यांना प्रदान करावयाच्या प्रोत्साहनपर राशी तसेच खरेदीची रक्कम थकीत होती. यासाठी सुमारे ८०० कोटी रक्कम थकीत असताना केवळ ३३८ कोटींची रक्कम मंजूर केली. राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाच्या बोनसची रक्कम पूर्णपणे प्रदान न केल्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतीकामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असताना त्यांच्या हक्काची रक्कम थकीत असल्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशातच मुसळधार पावसाने शेतीला फटका बसल्याने धान उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व अन्न नागरी पुरवठामंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करण्यासोबतच भेट समस्येकडे लक्ष वेधले होते.

Web Title: Grain bonus amount to farmers and agent organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.