केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:30 AM2021-09-26T04:30:38+5:302021-09-26T04:30:38+5:30

पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटलांची पदे रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन ...

Grain should be given to orange ration card holders | केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य द्यावे

केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य द्यावे

googlenewsNext

पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटलांची पदे रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रिक्त पदांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शासनाने रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कठड्यांअभावी अपघाताची शक्यता

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही नद्यांच्या पुलावरील कठडे तुटले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावरील पुलाच्या कठड्याचे त्वरित बांधकाम करावे, अशी मागणी केली जात आहे.

वेगवान वाहनांवर कारवाई करा

चंद्रपूर : स्पर्धात्मक युगात अल्पवयीन मुले मोटारसायकलवर स्वार होऊन सुसाट वेगाने दुचाकी चालवितात. त्यामुळे अपघात होत आहेत. शहरातील वर्दळीच्या मुख्य मार्गावर भरधाव वेगाने वाहन चालविली जातात. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यात्रास्थळांना सुविधेचा अभाव

चंद्रपूर : जिल्ह्यात चिमूर, कोरपना, राजुरा, सिंदेवाही, गोंडपिपरी आदी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी यात्रा भरते; मात्र येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. आता मंदिरे सुरू करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक यात्रास्थळांचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.

लिलावाअभावी वाहने धूळ खात

चंद्रपूर : येथील रामनगर आणि शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेली वाहने लिलावाअभावी अद्यापही धूळ खात आहेत. काही वाहने निकामी झाली असून, त्याचे स्पेअरपार्टही बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. या वाहनांचा लिलाव करण्याची मागणी आहे. यामुळे पोलीस स्टेशन परिसरातील जागा मोकळी होईल.

वस्त्यांमधील बागेकडे मनपाचे दुर्लक्ष

चंद्रपूर : चंद्रपुरातील वस्त्यांमध्ये प्रशासनाने बागेसाठी जागा आरक्षित केल्या आहेत. ज्या ठिकाणी बाग आहे, त्या बागेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या बागांचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

जड वाहनांना बंदी घालण्याची मागणी

चंद्रपूर : येथील बिनबागेट मार्गे राम नगर चौकात जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या संख्येने जड वाहने जातात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. इतर वाहनांमुळे जड वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागते. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Grain should be given to orange ration card holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.