कृषी विज्ञान केंद्रातर्फे हरभरा पीक शेती दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:31 AM2021-03-01T04:31:58+5:302021-03-01T04:31:58+5:30
डॉ. व्ही. जी. नागदेवते यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उमा राजू लोनगाडगे होते. डॉ. सोनाली लोखंडे यांनी ...
डॉ. व्ही. जी. नागदेवते यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उमा राजू लोनगाडगे होते.
डॉ. सोनाली लोखंडे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व व पद्धत याविषयी, प्रा. पी. पी. देशपांडे यांनी हरभरा पिकामधील एकात्मिक कीड व रोग नियंत्रणविषयी आणि भास्कर एन. गायकवाड यांनी पिकेल ते विकेल अभियान, तसेच शासनाच्या विविध योजनाविषयी सखोल मार्गदर्शन केले. गजानन लोनगाडगे आणि आनंदराव लोनगाडगे या लाभार्थ्यांनी हरभरा या पिकाच्या जॉकी -९२१८ या वाणाच्या उत्पादनाविषयी प्रात्यक्षिक राबविताना कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केल्याचे समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकेत डॉ. विजय एन. सिडाम, संचालन यु. एस. नाईक यांनी केले. आयोजनासाठी व्ही. जी. माने यांनी सहकार्य केले.