ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर
By admin | Published: June 23, 2014 11:48 PM2014-06-23T23:48:27+5:302014-06-23T23:48:27+5:30
जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील गोरज, चपराळा, पोंभूर्णा तालुक्यातील जामखूर्द, जामतुकूम तसेच गोंडपिपरी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
अनेकांना धक्का : पोंभुर्णा, गोंडपिपरी, भद्रावती तालुक्यांतील गावांचा समावश
चंद्र्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील गोरज, चपराळा, पोंभूर्णा तालुक्यातील जामखूर्द, जामतुकूम तसेच गोंडपिपरी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
सभापती हर्षा चांदेकर यांच्या पॅनलचा धुव्वा
गोंडपिपरी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर करण्यात आला. यात गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापती हर्षा चांदेकर यांच्या कुडेसावली येथील पॅनलचा पराभव झाला. तर गोजोलीत जातीच्या बनावट दाखल्याने चर्चेत आलेल्या निवडणुकीत राजेश डोंगरेचा दोन मतांनी पराभव झाला.
तालुक्यातील सात गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. कुडेसावली व गोजोली येथील निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या.
कुडेसावलीत गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापती हर्षा चांदेकर यांनी आपला पॅनल निवडणुकीकरिता उभा केला होता. मात्र त्यांच्या पॅनलचा पराभव झाला. त्यांच्या पॅनलचे एकही उमेदवार निवडून येऊ शकले नाही. कुडेसावलीत विलास सुर, अरूणा झाडे, दशरथ तुमराम, भैया सहारे, अर्चना मडावी, रमाबाई चांदेकर, नंदा सुर हे उमेदवार विजयी झालेत. गोजोलीत बनावट जात पळताळणी प्रमाणपत्राने ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत वासुदेव डोंगरे यांनी राजेश डोंगरे यांचा दोन मतांनी पराभव केला. गोजोलीतून जीवनकला शेडमाके, उज्वला दुर्गे, विकास मोहुर्ले, अनिल शेडमाके, लक्ष्मी प्रधाने आदींचा विजय झाला. नांदगावात भारत खामनकर, शारदा खामनकर, कानू ठेंगणे, पुष्पा मडावी, वर्षा कन्नाके, नरेंद्र पिदुरकर विजयी झालेत. घडोलीत सुधाकर कोकोडे, कोमल धुडसे, पोर्णिमा मेश्राम, संगिता भोयर, निळकंठ चौधरी यांनी बाजी मारली. तर कन्हाळगावात प्रदिप कुळमेथे, सुनंदा कोडापे, सहदेव कुंभरे, मंगला मडावी, शालु आत्राम यांनी विजयश्री मिळविली. दुबारपेठ येथे प्रकाश तलांडे, सईबाई कुबडे, नितेश तलांडे, किरण तलांडे, दिलीप आत्राम विजयी झालेत.
गोरजा व चपराळा
येथील विजयी उमेदवार
भद्रावती तालुक्यातील गोरजा ग्रामपंचायतमध्ये विनोद शामराव नळे, कमल किशोर टेकाम, पुरुषोत्तम दशरथ डोंगे, किसन संगीत नळे (अविरोध), अमल दिलीप गडूकर (अविरोध), कुसुम जंगलु उरकुडे (अविरोध) निवडून आले. चपराळा ग्रामपंचायतमध्ये राहुल शेडांगे, गायत्री कोंठेवार, सुषमा नवले, मालती मेश्राम, ज्ञानेश्वर सिडाम, मंगला बच्चाशंकर, अशोक ताजने यांचा समावेश आहे.
जामतुकूम ग्रामपंचायत
देवाडा (खुर्द) : जामतुकुम येथे १६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी सात उमेदवार विजयी झाले. तसेच जामखुर्द येथे १७ उमेदवार रिंगणात होते. यात सात विजयी झाले. सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला राखीव असल्याने सदस्यांमध्ये रस्सीखेच चालू आहे.
विजयी उमेदवारांमध्ये रवींद्र भाऊराव गेडाम, छाया यशवंत झाडे, सुषमा प्रमोद सुरजागडे, गजानन श्रावण गद्देकार, अंतकला उमाजी पोरेते, भालचंद्र बोधलकर, अर्चना देऊरमल्ले तर जामखुर्दमध्ये वामन रूषी सिडाम, लक्ष्मी अरविंद कुंभरे, अल्का रवींद्र सोमनकार, महादेव बाबाजी सोमनकार, वंदना नरेंद्र पिपरे, रंजीत नामदेव गेडाम, वंदना धनराज बुरांडे यांचा समावेश आहे.विजयी उमेदवारांनी गावातून विजयी रॅली काढली.
निकालादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
(विविध वार्ताहरांकडून)