ग्रामपंचायत कार्यालय ताडाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:35 AM2021-06-09T04:35:39+5:302021-06-09T04:35:39+5:30
चंद्रपूर : अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून रोजी रायगडावर राज्याभिषेक पार पडला. तोच दिवस महाराष्ट्र शासनाने ...
चंद्रपूर : अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून रोजी रायगडावर राज्याभिषेक पार पडला. तोच दिवस महाराष्ट्र शासनाने शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिनाचे औचित्य साधून ताडाळी ग्रामपंचायत येथे भगवा ध्वज पताका उभारून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत
सरपंच संगीता पारखी, उपसरपंच निकीलेश चामरे,
ग्रा. पं. सदस्य संजोग अडबाले, अशोक मडावी, कविता निखाडे, ग्रामसेवक एकनाथ पिंपळशेंडे, कर्मचारी प्रमोद जूनघरे, रितेश शेंडे, राजेश पाटील आदी उपस्थित होते.
------
डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर
फोटो
चंद्रपूर : स्थानिक डाॅ. आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कोरोना नियमांचे पालन करीत शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय बेले, प्रमुख वक्ते म्हणून प्रा. राहुल मानकर उपस्थित होते. यावेळी प्रा. मानकर यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीचा संघर्ष व शिवराज्याभिषेक दिनाविषयी मार्गदर्शन केले. संचालन प्रा. सतीश पेटकर, तर आभार डॉ. नितीन घुगरे यांनी मानले.
------
रा. महात्मा गांधी महाविद्यालय, चंद्रपूर
चंद्रपूर : रा. महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागातर्फे शिवस्वराज्य दिन आभासी पद्धतीने साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रमौली तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. रामचंद्र वासेकर उपस्थित होते. यावेळी डॉ. वासेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. तर प्राचार्य डॉ. चंद्रमौली यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे एका जातीपुरते मर्यादित नसून त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केले असल्याचे सांगितले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. नीलिमा उमाटे यांचे काेरोनाने निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालन व आभार प्राध्यापक संदीप देशमुख यांनी मानले.