ग्रामसडक योजनेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:15 PM2018-02-16T23:15:41+5:302018-02-16T23:16:11+5:30
ग्राम सडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना अपघाती विमा लागू करावा, तसेच महिला कर्मचाऱ्यांना प्रसृती रजा मंजूर करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : ग्राम सडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना अपघाती विमा लागू करावा, तसेच महिला कर्मचाऱ्यांना प्रसृती रजा मंजूर करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
आॅगस्ट २०१६ मध्ये कंत्राटी कामगार रुपेश दिघोरे यांचा अपघाती मृत्यू झाला. यावेळी उपचारासांठी त्यांच्यावर कुंटुबांनी १६ लाख रुपये खर्च केले. मात्र त्याला शासनाकडून कुठलिही मदत मिळाली नाही. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी पदावर कार्यरत असलेले अभिजित पाटील यांच्यासुद्धा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. मात्र अद्यापही त्यालाही शासनाने कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे अपघात निधीची देण्याच्या मागणीसाठी ग्रामीण विकास कर्मचारी संघटनेतर्फे २०१६ ला उपोषण केले होते. यावेळी मुख्य अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र अद्यापही कोणत्याही मागण्याची पूर्तता करण्यात आली नाही. परिणामी गुरुवारपासून ग्रामीण विकास रस्ते कंत्राटी कर्मचारी संघटनेतर्फे उपोषणाला बसले आहेत. यामध्ये नरेंद्र मेश्राम, प्रभाकर पाडेवार, शेख जफर अहेमद अब्दूल समद आदींचा समावेश आहे.