ग्रामीण विद्यार्थ्यांनो स्पर्धेसाठी सक्षम व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:17 PM2019-01-18T22:17:50+5:302019-01-18T22:18:30+5:30

शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात आमुलाग्र बदल होतो. अलिकडे बदलत्या शिक्षण पध्दतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. शिक्षणामुळे ज्ञानवंतच नव्हे तर सामाजिक भान जोपासणारी पिढी तयार व्हावी, याकरिता शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे.

Grameen students become eligible for the competition! | ग्रामीण विद्यार्थ्यांनो स्पर्धेसाठी सक्षम व्हा !

ग्रामीण विद्यार्थ्यांनो स्पर्धेसाठी सक्षम व्हा !

Next
ठळक मुद्देशैक्षणिक सुविधांमध्ये वाढ

शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात आमुलाग्र बदल होतो. अलिकडे बदलत्या शिक्षण पध्दतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. शिक्षणामुळे ज्ञानवंतच नव्हे तर सामाजिक भान जोपासणारी पिढी तयार व्हावी, याकरिता शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. यामुळे शिक्षणापासून वंचित असणारी ग्रामीण भागातील मुले मुख्य प्रवाहात येऊ लागली आहेत. प्राथमिक शिक्षण दर्जेदार असेल तर विद्यार्थ्यांच्या जीवनावर दीर्घकालीन परिणाम होतो. जिल्ह्यातील शिक्षणाची परिस्थिती बदलत आहे. याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आता स्पर्धेसाठी सक्षम झाले पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती कृष्णा सहारे यांनी मकरसंक्रातीनिमित्त लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
बहुतेक पालकांचा कल कॉन्हेंट शिक्षणाकडे वाढू लागला आहे. मुलांवर अपेक्षांचे ओझे लादून आर्थिक क्षमता नसतानाही कॉन्हेंट संस्कृतीला बळी पडत आहेत. हा बदल लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षणाच्या पायाभुत सुविधांमध्ये वाढ केली आहे. ज्ञानसंरचनावाद या संकल्पनेवर शिक्षण विभागाने भर दिला असून मुलांच्या बौध्दिक प्रगतीसाठी उपक्रम राबविल्या जात आहे.

विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ व्हावी, यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची असते. स्पर्धेच्या युगातील विद्यार्थी अविरत टेंशनमध्ये असतात. अशावेळी त्यांना सकारात्मक विचाराचे बळ सातत्याने देणे पालकांचे कर्तव्य आहे. ते त्यांनीही पार पाडावे, असेही सहारे यांनी सांगितले.

Web Title: Grameen students become eligible for the competition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.