बीडीओला घेराव घालताच डोमाला मिळाला ग्रामसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:05 AM2017-10-08T01:05:04+5:302017-10-08T01:05:35+5:30
पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत डोमा येथे मागील चार वर्षांपासून ग्राम सेवक अतिअल्प काळ सेवेत राहतो. वारंवार ग्रामसेवक बदलत असल्याने गाव विकासापासून वंचित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत डोमा येथे मागील चार वर्षांपासून ग्राम सेवक अतिअल्प काळ सेवेत राहतो. वारंवार ग्रामसेवक बदलत असल्याने गाव विकासापासून वंचित आहे. त्यामुळे गावकºयांनी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच प्रफुल्ल कोलते यांच्या नेतृत्वात पंचायत समितीवर धडक देऊन बीडीओला घेराव घातला. त्यामुळे ग्रामसेवक कापगते यांचा प्रभारी म्हणून आदेश काढल्याने सदर आंदोलनाला यश आले आहे.
ग्रामपंचायत डोमा येथे मागील चार वर्षांत अनेक ग्रामसेवक आले. ते सेवा देत असताना त्याची बदली व्हायची, त्यामुळे वारंवार बदली होत असल्याने ग्रामसेवक येण्यास टाळाटाळ करीत होते. जनतेची कामे होत नव्हती, दरम्यान तीन मासिक सभा, तीन ग्रामसभा ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीत झाल्या. पण याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. जनता त्रस्त होत होती. अखेर भारतीय जनता युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच प्रफुल्ल कोलते यांचे नेतृत्वात पं.स.कार्यालयासमोर आंदोलन केले. दरम्यान ग्रामसेवक मिळालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी बीडीओने दखल घेत, आंदोलनकर्त्यांना बीडीओ कक्षात बोलवून चर्चा केली. दरम्यान डोमा ग्रामपंचायतला प्रभारी ग्रामसेवक म्हणून कापगते यांच्या नावाचा अध्यादेश काढण्यात आला.
यावेळी उपसरपंच देवानंद मालके, ग्रा.पं.सदस्य तुळशीराम दोडके, सूरज गायकवाड, देविदास हजारे, शामराव चौधरी, महागू शेलोरे, विलास कुर्वे, संजय किरीमकर, ईश्वर हनवते, मनोज दुर्गपाल, मेघा शेंडे, माधुरी वैध आदी उपस्थित होते.