निलंबन रद्द करण्यासाठी ग्रामसेवकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2016 01:29 AM2016-01-14T01:29:26+5:302016-01-14T01:29:26+5:30

पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या कढोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एच.एम. मने यांच्यावर गैरव्यवहाराचा ठपका ठेवून निलंबीत करण्यात आले.

Gramsevak's agitation for cancellation of suspension | निलंबन रद्द करण्यासाठी ग्रामसेवकांचे आंदोलन

निलंबन रद्द करण्यासाठी ग्रामसेवकांचे आंदोलन

Next

सावली तालुका : सूडबुद्धीने कार्यवाही केल्याचा आरोप
सावली : पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या कढोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एच.एम. मने यांच्यावर गैरव्यवहाराचा ठपका ठेवून निलंबीत करण्यात आले. त्यांच्यावर अन्याय झाला असून प्रशासनाने त्यांचे निलंबन रद्द करावे याकरिता तालुक्यातील ग्रामसेवकांनी मंगळवारपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन निर्णय क्र. मग्रारोहयो/ २०११/ प्र.क्र. ४०/ रोहयो १० अ. २ मे २०११ अन्वये ग्रामरोजगार सेवकांना त्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. त्यानुसार ग्रामरोजगार सेवकाने कामावरील हजेरीपट भरणे व हजेरी पटाप्रमाणे मजूर उपस्थित आहे किंवा नाही याची शहनिशा करणे व हजेरीपठ सांभाळणे आदी सर्वस्वी जबाबदारी ग्रामरोजगार सेवकांची असताना त्याला दोषी न ठरविता ग्रामसेवकाची हजेरीपटावर प्रती स्वाक्षरी करणे एवढीच जबाबदारी असताना सुद्धा ग्रामसेवकावर सुडबुद्धीने निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.
ग्रामसेवक मने यांच्यावर झालेली कार्यवाही अन्यायकारक आहे. त्यामुळे ग्रामसेवक संघटना या अन्यायकारक कृतीचा जाहीर निषेध करून १२ जानेवारीपासून असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
पत्रकान्वये आंदोलनादरम्यान ग्रामसेवक साज्यातील सर्व कामे सुरळीत पार पडतील. मात्र कोणतेही शासकीय अहवाल सादर करण्यात येणार नाही. आंदोलनाच्या कालावधीत पंचायत समिती स्तरावरील मासीक व पाक्षीक सभेवर बेमुदत बहिष्कार टाकण्यात येईल. कोणताही दस्तऐवज अधिकाऱ्यांना दप्तर तपासणीकरीता उपलब्ध करून दिला जाणार नाही.
तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत कामावरील हजेरीपट काढणे व हजेरीपटावर प्रतीस्वाक्षरी करण्यात येणार नाही, असे कळविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Gramsevak's agitation for cancellation of suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.