भाजीपाल्याच्या टेम्पोने चिरडून आजी-नाती ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:57+5:302021-08-17T04:33:57+5:30

भिकेश्वर मार्गावरील घटना नागभीड : सकाळी फिरायला निघालेल्या आजी व तिच्या नातीला भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पोने चिरडले. यात दोघींचाही ...

Grandparents killed by crushing vegetable tempo | भाजीपाल्याच्या टेम्पोने चिरडून आजी-नाती ठार

भाजीपाल्याच्या टेम्पोने चिरडून आजी-नाती ठार

Next

भिकेश्वर मार्गावरील घटना

नागभीड : सकाळी फिरायला निघालेल्या आजी व तिच्या नातीला भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पोने चिरडले. यात दोघींचाही मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ६ वाजता भिकेश्वर येथे राष्ट्रीय महामार्गावर घडली. या प्रकाराने सकाळी या मार्गावर माॅर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

सुगंधा विश्वनाथ अनवले (वय ६०) व हार्दिका अमन मिसर अशी मृत आजी-नातीची नावे आहेत. सुगंधा आणि हार्दिका या दोघी आजी-नाती सकाळी फिरायला निघाल्या होत्या. त्या आपल्या बाजूनेच चालत असताना नागपूरकडून आरमोरीकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या टेम्पोचालकाने टेम्पो (एमएच ३३ / टी २४७०) बेफिकिरी व अविचाराने चालवून आजी-नातीच्या अंगावरच नेला. टेम्पो अंगावरच गेल्याने दोघीही चिरडल्या गेल्या. त्यानंतर टेम्पो विद्युत खांबाला धडकून पलटी झाला. यात आजीचा जागीच, तर नातीचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चालकाविरोधात कलम २७९,३०४ (अ ) भादंवि सहकलम १८४, १३४/ १७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. संधी साधून वाहनचालक पळून गेला. ठाणेदार प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

बॉक्स

हार्दिका पाहुणी म्हणून आली होती

हार्दिका ही सुलेझरी येथील रहिवासी आहे. सध्या शाळा नसल्याने ती आजीकडे रविवारीच पाहुणी म्हणून भिकेश्वर येथे गेली होती आणि सोमवारी काळाने तिच्यावर घाला घातला. तिच्या या अकाली मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

160821\1325-img-20210816-wa0025.jpg

पलटलेला टेंपो

Web Title: Grandparents killed by crushing vegetable tempo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.