पावसामुळे धानाचे पोते भिजले
By admin | Published: January 3, 2015 12:49 AM2015-01-03T00:49:29+5:302015-01-03T00:49:29+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धान आणले. मात्र अवकाळी पाऊस झाल्याने धानाचे हजारो पोते भिजले आहे.
मूल : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धान आणले. मात्र अवकाळी पाऊस झाल्याने धानाचे हजारो पोते भिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान असून अडत्यांप्रती तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहे.
धान पीक निघाले असून शेतकरी धान्य विक्रीसाठी येथील बाजार समितीत आणले. मात्र, जागेअभावी धानाचे पोते मोकळ्या जागेत ठेवण्यात आली होती. मात्र, अचानक गुरुवारच्या रात्री पाऊस झाला. त्यामुळे उघड्यावर असलेले धानाचे पोते पावसात भिजले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४० अडत्यांच्या मार्फतीने व्यापाऱ्यांकडून धानाची खरेदी होते. प्रत्येक शेतकरी अडत्याच्या विश्वासावर बाजार समितीमध्ये धानाचे पोते ठेवतात. धानाची संपूर्ण जबाबदारी अडत्याची असते. मात्र, येथीलच काही अडत्यांनी भिजलेले पोते शेतकऱ्यांना परत नेण्याचा अट्टाहास सुरु केला आहे.
सद्यस्थितीत विक्रीसाठी आणलेले ५० हजार पोते धान पोते भिजल्यामुळे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे धान भिजू नये यासाठी बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, सचिव चतुर मोहुर्ले व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)