दारूसाठी नातवाने तोडला आजीचा कान; दोन वर्षाच्या कारावासाची मिळाली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 06:13 PM2023-02-18T18:13:58+5:302023-02-18T18:19:34+5:30

गोंडपिपरी तालुका न्यायालयाचा निर्णय

Grandson sentenced Imprisonment of two years for snatching grandmother's gold earrings for liquor | दारूसाठी नातवाने तोडला आजीचा कान; दोन वर्षाच्या कारावासाची मिळाली शिक्षा

दारूसाठी नातवाने तोडला आजीचा कान; दोन वर्षाच्या कारावासाची मिळाली शिक्षा

googlenewsNext

चंद्रपूर : दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून नातवाने चक्क आजीचा कानच तोडल्याची घटना दोन वर्षभरापूर्वी गोंडपिंपरी तालुक्यातील अळेगावात घडली होती. याप्रकरणी गोंडपिपरी तालुका न्यायालयाने बुधवारी निकाल देत नातवाला दोन वर्षांची शिक्षा व पाच हजारांचा दंड ठोठावला. राहुल देठे असे आरोपी नातवाचे नाव आहे.

राहुलला दारूचे व्यसन आहे. आधीच दारू पिऊन असताना पुन्हा त्याला दारू पिण्याची तलब आली. पण खिशात पैसे नव्हते. अशावेळी तो आपली आजी बुधाबाई रायपुरे (८०) यांच्या घरी गेला. दारूसाठी पैशांची मागणी केली, पण पैसे देण्यास आजीने नकार दिला. त्याला आजीच्या कानात सोन्याची बिरी दिसली. त्याने जबरदस्तीने आजीच्या कानातील सोन्याची बिरी खेचून पळ काढला. या घटनेत आजीचा कानच तुटला व गंभीर जखमी झाली.

याप्रकरणी आजीने गोंडपिपरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी कलम ३२७ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केला. ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस उपनिरीक्षक वसंत कोसनशिले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. न्यायाधीशांनी पुरावे तपासून आरोपी राहुलला दोन वर्षांची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. सरकारी वकील म्हणून ॲड. राजेश धात्रक यांनी कामकाज सांभाळले.

Web Title: Grandson sentenced Imprisonment of two years for snatching grandmother's gold earrings for liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.