चंद्रपूरात 50 लाखांचा अनुदान घोटाळा, क्रीडा अधिकाऱ्यांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 03:51 PM2018-07-20T15:51:47+5:302018-07-20T15:52:52+5:30
जिल्ह्यातील 12 संस्थाविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या संस्थांकडून 50 लाखांचा घोटाला करण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
चंद्रपूर - जिल्ह्यातील 12 संस्थाविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सन 2008 ते 2015-16 या कालावधीत सदर 12 संस्थांना व्यायामशाळा विकास, क्रीडांगण विकास व युवक कल्याण योजनेंतर्गत अनुदान दिले होते. मात्र, या अनुदानाद्वारे 50 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप क्रीडा अधिकाऱ्यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या या अनुदानाचा विनियोग केला गेलाच नाही. या अनुदानाची रक्कम 14 टक्के व्याजासह शासनाला परत करण्याचे पत्रही देण्यात आले होते. मात्र, ही रक्कम परत दिली नाही. त्यामुळे ही शासनाची फसवणूक आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप गोतमारे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.