कापूस उत्पादकांना सानुग्रह अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:44 PM2018-12-02T22:44:02+5:302018-12-02T22:44:20+5:30
यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने कापूस उत्पादनात घट झाली त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकºयांना एकरी तीस हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने कापूस उत्पादनात घट झाली त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकºयांना एकरी तीस हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
रोखीचे पीक म्हणून शेतकरी कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कापूस विकल्यानंतर शेतकरी वर्षाचे आर्थिक नियोजन करीत असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, जिवती, चंद्रपूर, चिमूर आदी तालुक्यात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात राहतो. यावर्षी अनेक शेतकºयांना कपाशीची दुबारा पेरणीही करावी लागली. अशा परिस्थितीत काही प्रमाणात वाढलेल्या झाडांना मध्येच दडी मारलेल्या पावसाचा फटका बसला. त्यातच हंगामाच्या सुरवातीला झालेल्या अल्पशा पाऊस झाल्यानंतर वातावरणात काही काळ उकाडा आल्याने एका वेचनीनंतर कापूस निघणे बंद झाले. त्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना बियाने मशागत आदीकरिता लागलेला खर्चही निघणार नाही.त्यामुळे चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा व कापूस उत्पादक शेतकºयांना एकरी तीस हजार रुपये अनुदान देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
जिल्हाधिकाºयांना निवेदन देणाºया शिष्ठमंडळात विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मो. वि. टेमुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष संदीप गड्डमवार, राकाँप्रदेश सरचिटणीस राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी ओबीसी सेल राज्य उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे, जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष नितीन मत्ते, निकीत भटारकर, ज्योती रंगारी, राजीव कक्कड, सुरेश रामगुंडे, सरपंच विशाल पारखी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.