संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान गावोगावी थेट पोहोचवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:58+5:302021-06-17T04:19:58+5:30
मंगळवारी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या अनुषंगाने ऑनलाइन बैठक घेतली. बैठकीला पोंभुर्णाचे तहसीलदार, विविध बँकांचे शाखा ...
मंगळवारी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या अनुषंगाने ऑनलाइन बैठक घेतली. बैठकीला पोंभुर्णाचे तहसीलदार, विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, ईश्वर नैताम, नगरपंचायत मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, मोहन चलाख, जि. प. सदस्य राहुल संतोषवार, अजित मंगळगिरीवार, सुनीता मॅकलवार, पं. स. सदस्य विनोद देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदारांनी त्वरित सर्व बँकांना यासंबंधीचे पत्र पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. नवेगाव मोरे येथील बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकांनी पोलीस शिपाई उपलब्ध करण्याची मागणी केली असता त्वरित पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून पोलीस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आ. मुनगंटीवार यांनी दिले. बँकांसमोर मंडप टाकून बसण्यासाठी खुर्च्या, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना भाजप पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
बॉक्स
घरकुलच्या अडचणी सोडविण्यासाठी शिबिर
प्रधानमंत्री आवास योजना तसेच शबरी आवास योजनेचा आढावादेखील आ. मुनगंटीवार यांनी यावेळी घेतला. पंतप्रधान आवास योजनेच्या १६८ लाभार्थ्यांच्या डीबीआर मंजूर असून त्यातील बहुतांश प्रकरणे मान्य झाली आहेत. काही प्रकरणांमध्ये आखीव पत्रिका, कार्यालयीन प्रकरणी काही अडचणी असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. तसेच शबरी आवास योजनेसाठी निधी प्राप्त असून तशाच अडचणी यासंदर्भात असल्याचे त्यांनी सांगितले. या अडचणींच्या निवारणासाठी एक शिबिर आयोजित करावे व त्यासाठी भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी तसेच वकील यांना आमंत्रित करण्याच्या सूचना आमदार मुनगंटीवार यांनी दिल्या.