त्रुटी पूर्तता करणाऱ्या शाळेला अनुदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:25+5:302021-06-27T04:19:25+5:30
यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांनी आमदार वंजारी यांना सोमवारी कुठल्याही परिस्थितीत मुंबईला उपस्थित राहून हा प्रश्न सोडविण्याची आग्रहाची विनंती केली. ...
यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांनी आमदार वंजारी यांना सोमवारी कुठल्याही परिस्थितीत मुंबईला उपस्थित राहून हा प्रश्न सोडविण्याची आग्रहाची विनंती केली. यावेळी आमदार वंजारी आणि आमदार विकास ठाकरे या दोन्ही आमदार महोदयांनी सोमवार व मंगळवार या दोन्ही दिवसांचे स्थानिक कार्यक्रम रद्द करून मुंबईला स्वतः उपस्थित राहून हा प्रश्न नक्कीच मार्गी लावू आणि जर तशी वेळ पडली तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मी स्वतः तुमच्यासोबत आंदोलनाला बसणार, असे भेटीप्रसंगी सांगितले. याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक असोशिएयनचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. किशोर उमाटे, चंद्रपूर उच्च माध्यमिक कृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा अजय अलगमकर, गडचिरोली उच्च माध्यमिक कृती समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा. संदीप अर्जुनकर, नागपूर कृती समितीचे प्रा. डाखोरे, नागपूर महिला जिल्हाध्यक्षा प्रा,प्रणाली सरोदे, कार्याध्यक्ष प्राचार्य रमेशराव पायपरे, प्राचार्य उमेश पंधरे उपस्थित होते.