आर्थिक प्रगतीसाठी महिला बचतगटांना देणार अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:48 AM2019-07-13T00:48:48+5:302019-07-13T00:50:01+5:30

महिलांच्या आर्थिक विकासाच्या वाटा मोकळ्या होऊन प्रगती करावी, यासाठी पाच महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. याशिवाय अन्य योजनांसाठी अनुदान दिल्या जाणार असून महिलांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Grants to women's groups for financial progress | आर्थिक प्रगतीसाठी महिला बचतगटांना देणार अनुदान

आर्थिक प्रगतीसाठी महिला बचतगटांना देणार अनुदान

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्ह्यातील पाच महिला बचतगटांना मिनी ट्रॅक्टरचे वितरण, विविध योजनातून प्रगती साध्य

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महिलांच्या आर्थिक विकासाच्या वाटा मोकळ्या होऊन प्रगती करावी, यासाठी पाच महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. याशिवाय अन्य योजनांसाठी अनुदान दिल्या जाणार असून महिलांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गुरूवारी नियोजन भवनात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी आमदार नाना शामकुळे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे नरेश उगेमुगे उपस्थित होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत ९० टक्के अर्थसहाय्य देऊन मिनी ट्रॅक्टर वितरणाची योजना जिल्ह्यात राबवण्यात आहे. विशेष म्हणजे १० टक्के वाटा बचत गटांना भरायचा होता. परंतु, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी ही रक्कम स्वत: भरली. यातून जिल्ह्यातील पाच स्वयंसहायता महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांमध्ये करूणा स्वयंसहायता समूह चेक कोसंबी, संघटित महिला बचतगट पोंभूर्णा, रमाबाई महिला बचतगट फुटाणा, धम्मदीप महिला बचतगट पोंभूर्णा व रमाई महिला बचतगट जुनगाव आदींचा समावेश आहे. या योजनेमुळे महिला बचतगटांना मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून स्वत:ची शेती ट्रॅक्टरच्या माध्यमातून करता येणार आहे. ट्रॅक्टर भाड्याने देऊन स्वत:चा स्वतंत्र व्यवसायही उभा करण्याची संधी मिळाली आहे. आर्थिक प्रगती साध्य केल्यास महिलांची स्वतंत्र ओळख निर्माण होणार आहे.

Web Title: Grants to women's groups for financial progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.