सात्यतपूर्ण प्रयत्नातून मोठी लढाई जिंकता येते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:58 PM2019-06-24T22:58:25+5:302019-06-24T22:58:47+5:30
जीवनात यश संपादन करायचे असल्यास, कष्टाशिवाय पर्याय नाही. बऱ्याचदा प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर खचून न जाता निरंतर प्रयत्न करत राहा, प्रयत्नांनी मोठ्यातील मोठी लढाई जिंकता येते, असा आशावाद जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जीवनात यश संपादन करायचे असल्यास, कष्टाशिवाय पर्याय नाही. बऱ्याचदा प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर खचून न जाता निरंतर प्रयत्न करत राहा, प्रयत्नांनी मोठ्यातील मोठी लढाई जिंकता येते, असा आशावाद जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी व्यक्त केला.
उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टयानंतर चिमूकल्या विद्यार्थ्यांनी शाळा सुरू झाली. त्यामुळे चांदा पब्लिक स्कूल येथे प्रवेशोत्सव व गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी शाळेच्या संचालिका संजय जीवतोडे उपस्थित होत्या.
यावेळी सत्र २०१८-१९ मध्ये उच्चश्रेणीत गुणांकन प्राप्त करणारे विद्यार्थी ओम गिट्टे, इशिका राऊ त, अनुश्री ठाकरे, राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीतील वेदांत येरेकर, पाचवीतील राम ततारे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणाºया शिक्षकांचा तसेच दहाव्या वर्गात हिंदी विषयाच्या उत्कृष्ठ निकालाकरिता शाळेच्या शिक्षिका जेबा जाकिर, ओपन डोअर स्पर्धेत गणित विषयात राष्टÑस्तरावर २५ वा क्रमांक प्राप्त करणाºया एम. माधवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.
संचालन शाळेच्या शिक्षिका मजुंषा गौरकार तर आभार प्रिती चंद्रागडे यांनी मानले. यावेळी कार्यक्रम प्रमुख शोमा जाना तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.