महाऔष्णिक वीज केंद्राचे कार्य उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:55 PM2018-09-15T22:55:08+5:302018-09-15T22:55:48+5:30

चंद्रपूर वीज केंद्राचा देशात नावलौकिक आहे. केंद्राचे कार्यही उत्तम आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संचलन व देखभाल दुरुस्तीची कामे अधिक योग्य रितीने केल्यास संयंत्र वीज वापरात घट होऊन महत्तम वीज उत्पादन व आर्थिक बचत होण्यास मोठा हातभार लागेल.

Great functioning of the MahaAnational Power Center | महाऔष्णिक वीज केंद्राचे कार्य उत्तम

महाऔष्णिक वीज केंद्राचे कार्य उत्तम

Next
ठळक मुद्देचंद्रशेखर बावणकुळे : चंद्रपूर वीज केंद्राची पाहणी, विविध कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर वीज केंद्राचा देशात नावलौकिक आहे. केंद्राचे कार्यही उत्तम आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संचलन व देखभाल दुरुस्तीची कामे अधिक योग्य रितीने केल्यास संयंत्र वीज वापरात घट होऊन महत्तम वीज उत्पादन व आर्थिक बचत होण्यास मोठा हातभार लागेल. उपमुख्य अभियंता स्तराच्या अधिकाऱ्याने वीज उत्पादनासाठी चांगला कोळसा मिळविण्याकरिता कसोशीने पाठपुरावा करावा व शून्य डॅमरेजचे व्यवस्थापन करावे. वीज उत्पादनाच्या दैनंदिन कामकाजात अधिक व्यावसायिक सुलभतेची अंमलबजावणी करून अधिकाराचे विकेंद्रिकरण करावे, असे निर्देश राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाºयांना दिले.
ना. चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवारी चंद्रपुरात आले असता त्यांनी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची पाहणी केली. यावेळी ते अधिकाºयांशी बोलत होते.
चंद्रपूर विद्युत केंद्राच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर ५०० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८ व ९ प्लांट कंट्रोल रूम, ई.एस.पी. परिसर, उपहार गृह, कुलिंग टॉवरलाही ना. बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तंत्रज्ज्ञ आणि कंत्राटी कामगारांशी थेट संवाद साधला. त्यानंतर ५०० मेगावॅट सेवा इमारत येथील सर्च सभागृह येथे आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वीज केंद्राच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी बचतीसह वीज उत्पादन कायम राखल्याबद्दल त्यांनी वीज अधिकाºयांचे कौतुक केले. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी याबाबतचे संगणकीय सादरीकरण केले. यावेळी आमदार नाना श्यामकुळे यांची उपस्थिती होती.
‘त्या’ जागेवर सौर प्रकल्प
चंद्रपूर वीज केंद्राच्या बंद केलेल्या प्रत्येकी २१० मेगावॅटच्या संच क्रमांक १ व २ च्या जागेवर सुमारे एक हजार मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प किंवा ६६० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प उभारता येईल काय, यादृष्टीने तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.

Web Title: Great functioning of the MahaAnational Power Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.