चंद्रपूर जिल्ह्यावर भीषण जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 02:30 PM2018-04-24T14:30:38+5:302018-04-24T14:30:46+5:30

चंद्रपूर जिल्हा सध्या उष्णतेने होरपळून निघत आहे. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ९५८ गावात भीषण पाणी टंचाई आहे.

Great water crisis in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यावर भीषण जलसंकट

चंद्रपूर जिल्ह्यावर भीषण जलसंकट

Next
ठळक मुद्देतप्त उन्हात हजारो गावे तहानलेलीखड्डा खोदून त्यातील पाणी प्यावे लागत आहे गावकरी मध्यरात्री उठून पाणी भरतात

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सध्या उष्णतेने होरपळून निघत आहे. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ९५८ गावात भीषण पाणी टंचाई आहे. मात्र प्रत्यक्षात हजारो गावे पाण्यासाठी टाहो फोडत आहे. जिल्हा प्रशासनाने अद्याप एकाही गावात टँकर लावलेला नाही. विहिरी, बोअरवेलला पाणी नाही. त्यामुळे नागरिक दैनंदिन कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.
जिल्ह्यातील अकराही मोठे सिंचन प्रकल्प अखेरची घटका मोजत आहे. नदी-नाल्यातही अत्यल्प जलसाठा आहे. नद्यांमध्ये पाणी नसल्याने ग्रामीण पाणी पुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. हातपंप, विहिरी, बोअरवेल यामध्येही पाणी नाही. लखमापूर, बिबी, नांदा, कोठोडा, धामणगाव, नैतामगुडा, आसर (बु.), खिर्डी, वडगाव, चन्नई, मांगलहिरा, कोरपना, वनसडी, पिपर्डा, कोडशी (बु.), धोपटाळा, कन्हाळगाव, पिट्टीगुडा, भुरी येसापूर, अंतापूर, पदमावती, इंदिरानगर, पाटागुडा, कुंभेझरी, घनपठार यासारख्या अनेक गावात नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. जिवती, कोरपना तालुक्यात तर खड्डा खोदून त्यातील पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. हातपंपाला पाणी नसल्याने त्यात पाणी जमा होण्याची वाट पाहत गावकरी रात्रभर जागे राहतात. मध्यरात्री उठून पाणी भरतात. लहानसहान नद्यांचे पात्र कोरडे पडल्यामुळे तिथूनही पाणी आणणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागात एखाद्याच्या घरात लग्नसोहळा असेल तर पाण्याची तजवीज कशी करावी, हाच सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकत आहे. नागरिकांसोबत जनावरांच्या चारा आणि पाण्याचाही प्रश्न बिकट होत चालला आहे. गावखेड्यातील पाण्याचे स्रोत आटले असल्याने जनावरांना पाणी पाजायला कुठे न्यावे, हे पशुपालकांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे कवडीमोल भावात जनावरे विकली जात आहेत.

 

Web Title: Great water crisis in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.