सास्ती, गोवरी, विचोली खाणीला कोळसा मंत्रालयाची हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:44 PM2018-04-01T23:44:56+5:302018-04-01T23:44:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : राजुरा तालुक्यातील सास्ती, गोवरी आणि चिचोंलीसह सात प्रकल्पांना कोळसा मंत्रालयाने हिरवी झेंडी दाखविली आहे. जुन्या करारानुसारच शेतकऱ्यांना रक्कम आणि नोकºया मिळणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
ना. हंसराज अहीर हे राजुरा येथे आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी ना. अहीर पुढे म्हणाले, वेकोलिअधिकाºयांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सतत लढा देणारा नेता असून शेतकऱ्यांचा, यांच्या प्रश्नाचा नेहमी आदर करीत आलो आहे. ३० मार्च २०१८ ला कोळसा मंत्रालयाने एक पत्र जारी केले आहे. या अध्यादेशानुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जुन्या करारानुसारच रक्कम आणि नोकऱ्यां मिळणार असून सास्ती, गोवरी, चिंचोली कोळसा खाणीसह चंद्रपूर जिल्ह्यातील सात प्रकल्प मार्गी लागलेले आहे.
याप्रसंगी राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे म्हणाले, ना. हंसराज अहीर सतत प्रश्नांचा पाठपुरावा करणारा नेता असून वेकोलिचे प्रश्न सोडवून करोडो रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिले आहे. याप्रसंगी भाजपा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, भाजपा नेते राहुल सराफ, विस्तारक सतिश दांडगे, राजू घरोटे, अरुण मस्की, विनायक देशमुख, मधुकर नरड उपस्थित होते. संचालन अॅड. प्रशांत घरोटे यांनी केले. आभार बादल बेले यांनी मानले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.