घुग्घुसला नगरपरिषदेचा दर्जा देण्याला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:31 PM2018-07-18T23:31:33+5:302018-07-18T23:32:03+5:30
घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्याबाबतच्या जुन्या मागणीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. नागपूर येथील विधान भवनात विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी बोलाविलेल्या बैठकीत मागणी रास्त असल्याचे सांगून हरकतीबाबत नोेटीफिकेशन काढण्याचे निर्देश चंद्रपूर जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्याबाबतच्या जुन्या मागणीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. नागपूर येथील विधान भवनात विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी बोलाविलेल्या बैठकीत मागणी रास्त असल्याचे सांगून हरकतीबाबत नोेटीफिकेशन काढण्याचे निर्देश चंद्रपूर जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिले आहेत.
माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पडलेल्या या बैठकीत घुग्घुसला नगर परिषदेचा दर्जा देण्यासंदर्भात ग्रामस्थांचे निवेदन वाचून त्यांच्या अडचणीबाबत चर्चा झाली. ग्रामपंचायतीमध्ये अनेक सायी-सुविधांचा अभाव आहे. लोकसंख्या वाढत आहे. ही बाब ग्रामस्थांनी बैठकीत उपसचिवांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर बऱ्याच वर्षांची ही मागणी विचारात घेण्यात आली. घुग्घुस ग्रामपंचायत नगर परिषदेच्या सर्व निकषात बसते. सदर ग्रामपंतायतीच्या ठरावाच्या मागणीनुसार घुग्घुसला नगर परिषदेचा दर्जा देणे आवश्यक असल्याबाबत चर्चा झाली. उपसभापती ठाकरे यांनी नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव यांच्याशी प्राथमिक चर्चा करून अडचणींबाबतची माहिती जाणून घेतली. यानंतर चंद्रपूर जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना घुग्घुसला नगर परिषदेचा दर्जा देण्याबाबत नोटीफिकेशन काढण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाºयांनी दोन दिवसात नोटीफिकेशन काढून तातडीचे प्रस्ताव शासनास सादर करणार असल्याचे सांगितले.
बैठकीला जिल्हाधिकारी खेमणार यांच्यासह जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, ग्रामविकास उपसचिव संजय बनकर, नगर विकास उपसचिव मोघे, चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे शह सचिव महेश मेंढे, चंद्रपूर बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, चंद्रपूर पंचायत समितीचे माजी सभापती रोशन पचारे, घुग्घुस ग्रा.पं. सदस्य पवन आगदारी, बबलू सातपुते, दिलीप कांबळे, प्रशांत सरोकर, प्रवीण सोदारी, प्रेमानंद जोगी उपस्थित होते.
सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि यश
घुग्घुसला नगर परिषदेचा दर्जा मिळावा ही घुग्घुसवासीयांची जुनी मागणी पूर्ण व्हावी. यासाठी महेश मेंढे यांनी निवेदन सादर करून सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला आलेले हे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे. मेंढे यांच्या पत्राच्या अनुषंगाने विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र दिले. विरोधी पक्षनेता यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मागणीला अधिक बळकट केले होते.