अटी-शर्थीसह उद्योगांना हिरवाकंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:00 AM2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:31+5:30
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २४ एप्रिलपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याचे निर्देश आहे. उर्वरित सर्व दुकाने, उद्योग, दळणवळण बंद करण्यात आले. त्यानंतर आता राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे अशा जिल्ह्यांना वर्गवारीत ग्रिन झोन ठरविण्यात आले. या ग्रिन झोनमधील उद्योगांना सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र सोबतच काही अटीही लादण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र आणि राज्य शासनाने ग्रिन झोन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र सोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध अटी व शर्थीचे पालन करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे या अटी पाळत उद्योग सुरू करण्यात अनेक अडचणी येत असल्याने चंद्रपूर एमआयडीसीतील ५० टक्के उद्योग बंदच आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २४ एप्रिलपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याचे निर्देश आहे. उर्वरित सर्व दुकाने, उद्योग, दळणवळण बंद करण्यात आले. त्यानंतर आता राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे अशा जिल्ह्यांना वर्गवारीत ग्रिन झोन ठरविण्यात आले. या ग्रिन झोनमधील उद्योगांना सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र सोबतच काही अटीही लादण्यात आल्या. मात्र या अटींना अधीन राहून उद्योगात उत्पादन घेणे कठीण असल्याचे बहुसंख्य उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ८० पैकी ४० उद्योग अद्यापही बंदच आहे.
या अडचणींचा सामना
उद्योगांमध्ये आधीच मोजके कर्मचारी ठेवले जातात. त्यातही ५० टक्के कर्मचाऱ्यांना सुटी देण्याचे आदेश असल्याने केवळ ५० टक्के कर्मचाºयांच्या भरोशावर उत्पादन घेणे शक्य होत नाही. १० ते १५ टक्के कर्मचारी उद्योजक कमी करू शकतात. याशिवाय उद्योगात काम करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे प्रत्यक्षात शक्य नाही. उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल बाहेरून बोलवावा लागतो. तो आणताना अनेक अडचणी येतात. लॉकडाऊनमुळे उत्पादित होणारा अर्धा माल विकला जात नाही. त्यामुळे चंद्रपूर एमआयडीसीतील ५० टक्के उद्योग बंदच ठेवण्यात आले आहे, अशी माहिती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा यांनी दिली.
अशा आहेत अटी
उद्योग सुरू करताना उद्योगात केवळ ५० टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. ट्रान्सपोर्र्टींगसाठी येणाºया वाहनांना गेटवरच सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे. उद्योगात काम करताना सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक राहील. प्रत्येक कर्मचारी, कामगारांना सुरक्षा प्रदान करावी, अशा अनेक अटींचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सिमेंट उद्योजकांची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात उद्योजकांना उद्योग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र ५० टक्के उपस्थिती, सोशल डिस्टंन्सिंग व कामगारांची सुरक्षा आदीबाबत दिशानिर्देशाचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतची सूचना उद्योजकांना देण्यात आली आहे.
-डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर.
सिमेंट उद्योगांना सुरुवात
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक सिमेंट उद्योग आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग आतापर्यंत बंद होते. मात्र शासनाने २० एप्रिलपासून सिमेंट उद्योगांना सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार २० एप्रिलपासून सिमेंट उद्योग सुरू करण्यात आले आहे. मात्र या उद्योगात केवळ ५० टक्केच कर्मचारी कार्यरत असणार आहेत.