हरित योजनेमुळे होईल पर्यावरणाचे संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:27 PM2018-03-11T23:27:48+5:302018-03-11T23:27:48+5:30
केंद्र शासन पुरस्कृत अमृत (हरीत) योजनेंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरातील विविध प्रभागामध्ये सार्वजनिक प्रयोजनार्थ असलेल्या खुल्या जागांवर हरित क्षेत्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ या महानगरातील नागरिकांच्या स्वास्थ्य रक्षणाकरिता उपकारक ठरणार आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : केंद्र शासन पुरस्कृत अमृत (हरीत) योजनेंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरातील विविध प्रभागामध्ये सार्वजनिक प्रयोजनार्थ असलेल्या खुल्या जागांवर हरित क्षेत्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ या महानगरातील नागरिकांच्या स्वास्थ्य रक्षणाकरिता उपकारक ठरणार आहे. यामुळे प्रदूषणावरही मात होईल. या योजनेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीला चालना मिळणार असल्याने शहरी क्षेत्रातील पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या कार्यास हातभार लाभेल, असा विश्वास केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.
केंद्र पुरस्कृत अमृत हरित योजनेंतर्गत मनपाद्वारा आयोजित जुना चांदाफोर्ट येथील मोकळ्या जागेवर हरित क्षेत्र विकसित कामाचे भूमिपूजन ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आ. नाना श्यामकुळे, खुशाल बोंडे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जि.प.च्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, मनपा आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, रेल्वेचे वरिष्ठ अभियंता सत्यनारायण, शहर अभियंता महेश बारई, भाजपा मनपा गटनेते वसंता देशमुख, भाजपा जिल्हा महासचिव राहुल सराफ, मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती अनुराधा हजारे, मनपा झोन सभापती देवानंद वाढई, मनपा झोन सभापती आशा आबोजवार, मनपा झोन सभापती रंजना यादव उपस्थित होते.
यावेळी ना. अहीर यांनी रेल्वे प्रशासनाने या लोकाभिमुख, विकासाभिमुख कार्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देवून सहकार्य केल्याबद्दल रेल्वे अधिकाºयांच्या भूमिकेची प्रशंसा केली. चंद्रपूर महानगर ही गोंड राजाची राजधानी असून ऐतिहासिक भूमी आहे. त्यामुळे या महानगराला नवे स्वरूप प्राप्त करून देण्यात शासकीय अधिकाºयांनी पुढाकार घेतला, ही बाब सुखावह असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. शहरातील शंभर टक्के ले-आऊटचे हरितीकरण करणे हे आपले लक्ष्य असल्याचे सांगून ना. अहीर यांनी हे काम वेकोलिच्या सीएसआर निधीतून केले जाईल, असे सांगितले. याच योजनेतून दे.गो. तुकूम विभाग १ येथे (ख्रिश्चन हॉस्पीटल रोड) गुरूकूल गृह निर्माण सहकारी संस्था अभिन्यासातील खुल्या जागेवर, विधी महाविद्यालयासमोरील खुल्या जागेवर हरित क्षेत्र विकास कामांचे भूमिपूजन तसेच वेकोलि सीएसआर निधी अंतर्गत महाकुलकर ले-आऊट तुकूम येथील खुल्या जागेवर चैनलिंक कुंपन झाडे लावणे व वेकोलिच्या निधी अंतर्गत तुकूम येथील सर्व्हे क्र. १०४/२८ मधील विकास कामांचे, नगिनाबाग प्रभाग क्र. ९ येथील विश्वकर्मा कॉलनी दाताळा रोड येथे वेकोलि सीएसआर अंतर्गत गोविंदपूर रिठ ले-आऊट मधील खुल्या जागेतील विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
महाकाली मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी १० कोटी
लोकमत न्यूज नेटवर्कझरपट नदीचे पठाणपुरा गेटपर्यंत स्वच्छता करणे हे आपले प्राधान्यक्रमावरील कार्य आहे. महाकाली देवी चंद्रपूरचे आराध्य दैवत आहे. राज्यभरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे महाकाली मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी १० कोटी रूपये उपलब्ध होणार असल्याची माहिती ना. हंसराज अहीर यांनी यावेळी दिली. सरकारची धोरणे विकासाभिमुख असल्याने चंद्रपूर या ऐतिहासिक महानगराला सर्वांग सुंदर व विकास समृध्द करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. आजचा हा कार्यक्रम याच भूमिकेचा भाग असल्याचे ना. अहीर यांनी सांगितले.