बाबासाहेबांना यंदा घरूनच अभिवादन..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 05:00 AM2020-10-16T05:00:00+5:302020-10-16T05:00:43+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी अस्थिकलश रॅलीमध्ये शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी होतात. ह्यबौद्ध धम्म चिरायू होह्ण, डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार हो, अशा विविध घोषणा देत मिरवणूक निघत असे. मिरवणुकीचे संचालन समता सैनिक दलाचे जवान करायचे. हा देखणा व ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासारखाच असतो. परंतु, यंदा कोरोना महामारीमुळे ही प्रेरणादायी परंपरा खंडित झाली.

Greetings to Babasaheb from home this year ..! | बाबासाहेबांना यंदा घरूनच अभिवादन..!

बाबासाहेबांना यंदा घरूनच अभिवादन..!

Next
ठळक मुद्देकोरोनामुळे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूर दीक्षाभूमीवर लाखों अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या ऐतिहासिक दिनाचे स्मरण करण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने दीक्षाभूमीवर येतात. मात्र, कोरोनामुळे यंदा जाहीर कार्यक्रमांना प्रतिबंध असल्याने ६४ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनी आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच बाबासाहेबांना घरून अभिवादन करावा लागणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूरच्या ऐतिहासिक भूमीवर धम्मदीक्षा दिली. त्यामुळे १५ व १६ ऑक्टोबरला जिल्ह्यासह विदर्भातील लाखो बौद्ध अनुयायी मिळेल त्या वाहनाने दीक्षाभूमीवर दाखल होतात. सकाळी शहरातील विविध विहारात वंदनेचे पठण करून विहारातून रॅली काढल्या जात होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी अस्थिकलश रॅलीमध्ये शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी होतात. ह्यबौद्ध धम्म चिरायू होह्ण, डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार हो, अशा विविध घोषणा देत मिरवणूक निघत असे. मिरवणुकीचे संचालन समता सैनिक दलाचे जवान करायचे. हा देखणा व ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासारखाच असतो. परंतु, यंदा कोरोना महामारीमुळे ही प्रेरणादायी परंपरा खंडित झाली.
कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी १ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत कोणतेही कार्यक्रम करण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली.
त्यामुळे ६४ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा यंदा रद्द करण्यात आला आहे.

ध्वजारोहण व वंदना करून समारोप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोयायटीच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत सकाळी १० वाजता प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर बुद्ध धम्म, संघ वंदना पठण करण्यात येईल. या छोटेखानी कार्यक्रमानंतर समारोप करण्यात येणार आहे.

दीक्षाभूमीवर गर्दी करण्यास मनाई
कोरोनामुळे ६४ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा रद्द करण्यात आला. मात्र, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायी ऐतिहासिक दीक्षाभूमीवर येऊ शकतात. कोरोनाकाळात आरोग्यासाठी हे धोकादायक असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल सोसायटीकडून मनाई करण्यात आली आहे.

Web Title: Greetings to Babasaheb from home this year ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.