वर्षभरातील डिझेल दरवाढीने किराणा वस्तू महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:26 AM2021-05-17T04:26:31+5:302021-05-17T04:26:31+5:30
दरम्यान, कोरोना लॉकडाऊनमुळे काही निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फायदा किराणा व्यापारी उठवीत आहेत. एकच किराणा वस्तू व्यापारी वेगवेगळ्या ...
दरम्यान, कोरोना लॉकडाऊनमुळे काही निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फायदा किराणा व्यापारी उठवीत आहेत. एकच किराणा वस्तू व्यापारी वेगवेगळ्या किमतीत विकत आहेत. चढ्या दराने विक्री होत असल्याचा आरोपही ग्राहकांकडून होत आहे.
बॉक्स
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प पडला आहे. त्यामुळे आर्थिक अडचण भासत आहे. त्यातच दररोजच्या दरवाढीने घरचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. संसाराची आर्थिक घडी बसविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
- वैशाली जुमनाके, गृहिणी
----
गॅस सिलिंडरचे दरही वाढले आहेत. खाद्यतेलाच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. त्यात किराणा मालाच्या वस्तूंचे दरही वाढत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
- रंजू जीवतोडे, गृहिणी
---
पेट्रोल-डिझेलच्या किमती मागील वर्षभरात वाढल्या आहेत. त्या दरवाढीने भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे किराणा वस्तूंचा वाहतूक खर्च वाढला आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी किराणाच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे.
- संजू खजाजी, व्यापारी