पालकमंत्र्यांनी घेतला राजुरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:28 AM2021-05-09T04:28:22+5:302021-05-09T04:28:22+5:30

उपजिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटरला दिली भेट राजुरा : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपजिल्हा रुग्णालय राजुरा, कोविड केअर सेंटर ...

The Guardian Minister reviewed the health system in Rajura | पालकमंत्र्यांनी घेतला राजुरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

पालकमंत्र्यांनी घेतला राजुरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

Next

उपजिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटरला दिली भेट

राजुरा : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपजिल्हा रुग्णालय राजुरा, कोविड केअर सेंटर समाजकल्याण वसतिगृह राजुरा येथे शुक्रवारी भेट दिली. येथील कोरोना रुग्णांना विचारपूस करून व्यवस्था जाणून घेतली. यानंतर लगेच उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात विधानसभा क्षेत्रातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.

सर्वसामान्य जनता सध्या कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाने त्रस्त आहे. राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती व गोंडपिपरी या ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने वाढत असून, ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर इंजेक्‍शन, तसेच अन्य आवश्यक समस्या सोडविण्यासाठी आमदार सुभाष धोटे सतत प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री याबाबत सकारात्मक असून, लवकरात लवकर येथे सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, तहसीलदार हरीश गाडे, तहसीलदार महिंद्र वाकलेकर, तहसीलदार के. डी. मेश्राम, मुख्याधिकारी आर्शिया जुही, डॉ. विशाखा शेळकी, सूर्यकांत पिदूरकर, संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, बापूराव पाचपटील, तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश नगराळे, डॉ. डी. पी. चकोले, डॉ. स्वप्नील टेंभे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुलमेथे, डॉ. संदीप बांबोळे, डॉ. गेडाम, डॉ. गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. बावणे, डॉ. अशोक जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, उपविभागीय अभियंता बाजारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगरसेवक हरजित सिंग, नायब तहसीलदार विनोद डोणगावकर, अमित बनसोडे, अतुल गांगुर्डे आदी आढावा बैठकीला उपस्थित होते.

Web Title: The Guardian Minister reviewed the health system in Rajura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.