कष्टकरी व हात मेहनतीचे काम करणाऱ्यांसाठी पालकमंत्री समाजसेवकाच्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:28 AM2021-05-21T04:28:49+5:302021-05-21T04:28:49+5:30

चंद्रपूर : कोविड प्रादुर्भावामुळे रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने राज्यात लॉकडाऊन लागू केला. त्यामुळे ...

Guardian Minister in the role of social worker for hard working people | कष्टकरी व हात मेहनतीचे काम करणाऱ्यांसाठी पालकमंत्री समाजसेवकाच्या भूमिकेत

कष्टकरी व हात मेहनतीचे काम करणाऱ्यांसाठी पालकमंत्री समाजसेवकाच्या भूमिकेत

Next

चंद्रपूर : कोविड प्रादुर्भावामुळे रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने राज्यात लॉकडाऊन लागू केला. त्यामुळे कष्टकरी व हातावर काम करणाऱ्यांचा रोजगार बुडाल्याने पालकमंत्री विजय वडेट्टीवार व विजयभाऊ वडेट्टीवार मित्र परिवार यांच्याकडून ब्रम्हपुरी मतदार क्षेत्रातील ब्रम्हपुरी, सावली व सिंदेवाही तालुक्यातील कष्टकरी व हातमजुरीने काम करणाऱ्या सलून, चहाचे टपरी, घरकाम करणारे, रिक्शावाले, ऑटो चालक, डपरे वाजविणारा समाज, चपल बनविणारे व दुरुस्त करणारे, लोहार, सुतार यांच्यासह कष्टकरी काम करणाऱ्या परिवारांना प्रत्येकी एक हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेऊन त्याचा शुभारंभ ब्रम्हपुरी येथून करण्यात आला.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून कष्टकरी व हातावर काम करणाऱ्याचे रोजगार बुडाला. त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावे लागत असल्याचे बघून ब्रम्हपुरी, सावली व सिंदेवाही तालुक्यातील गरजूंना प्रत्येकी हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली.

याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके, नगर परिषद बांधकाम सभापती विलास विखार, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, नगरसेवक नितीन राऊत, पारधी, मुन्ना राऊत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Guardian Minister in the role of social worker for hard working people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.