चंद्रपूर जिल्हा प्रदुषण नियंत्रणाचा मास्टर प्लान बनविण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

By राजेश भोजेकर | Published: August 9, 2023 10:25 AM2023-08-09T10:25:58+5:302023-08-09T10:27:14+5:30

शहर परिसरात उद्योगांमुळे वायु, जल प्रदुषणासह आरोग्यावर परिणाम

Guardian Minister Sudhir Mungantiwar's directive to make a Master Plan for Chandrapur District Pollution Control | चंद्रपूर जिल्हा प्रदुषण नियंत्रणाचा मास्टर प्लान बनविण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

चंद्रपूर जिल्हा प्रदुषण नियंत्रणाचा मास्टर प्लान बनविण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

googlenewsNext

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग आहेत. त्याचप्रमाणे शहराच्या परिसरातही उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये स्टील, कागद, सिमेंट, औष्णिक वीज उद्योगांचा समावेश आहे. शहर परिसरात उद्योगांमुळे वायु, जल प्रदुषणासह आरोग्यावर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांमधील प्रदुषण नियंत्रणासाठी जगात असलेल्या चांगल्यात चांगल्या कार्यपद्धती अंमलात आणाव्यात, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. तसेच जिल्हा प्रदुषण नियंत्रणाचा मास्टर प्लान तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

सह्याद्री अतिथीगृह येथील सभागृहात चंद्रपूर जिल्हा प्रदुषणा नियंत्रणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला संबोधीत करताना मंत्री मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, सहसंचालक विद्यानंद मोटघरे, चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूर मनपा आयुक्त पालीवाल, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदी उपस्थित होते.

चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाला प्रदुषणमूक्त करून सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना करीत मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण पूर्ण करावे. तसेच प्रदुषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी मोहिम स्वरूपात कार्यक्रम राबवावा.  प्रदुषण दाखविणारा डिजीटल फलक शहरात प्रमुख चौकांमध्ये लावावा. प्रदुषण पातळीवरून नागरिकांनी कशापद्धतीने काळजी घेतली पाहिजे. याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करावे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रदुषणाचा आरोग्यावरील परिणामांबाबत जनजागृती करावी.  

मंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, प्रदुषणाबाबत सध्या अस्तित्वात असलेले नियम, कायदे, राष्ट्रीय हरीत लवादाचे निर्णय आदींबाबत छोट्या- छोट्या पुस्तिका तयार कराव्यात. नागरिकांना याबाबत जागरूक करावे. चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातील रिक्त पदे भरावीत. तसेच जिल्ह्यात खनिकर्म निधीमधून स्मशानभूमी देण्यात येणार आहे. यामध्ये दहन विधीसाठी पारंपारीक पद्धतीऐवजी नवीन तंत्रज्ञान वापरून पर्यावरण पूरक पद्धत वापरण्यात यावी. यासाठी यामधील नवीन तंत्रज्ञान तपासण्यात यावे.

प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक मोटघरे यांनी सादरीकरण केले. सादरीकरणातून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषणाबाबत माहिती दिली. तसेच उपाययोजना सांगितल्या. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Guardian Minister Sudhir Mungantiwar's directive to make a Master Plan for Chandrapur District Pollution Control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.