शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू : विजय वडेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 05:23 PM2021-11-21T17:23:57+5:302021-11-21T17:34:28+5:30

पावसामुळे हातात आलेले पीक गेले असले तरी शेतकऱ्यांनो खचू नका, असा धीर देत शासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी असून, कोणत्याही परिस्थितीत मदत करू, असा विश्वास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला.

guardian minister vijay wadettiwar visited farmer on loss of crop due to untimely rain | शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू : विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू : विजय वडेट्टीवार

Next
ठळक मुद्देअवकाळी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

चंद्रपूर : गत आठवड्यात सावली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे हातात आलेले पीक गेले असले तरी शेतकऱ्यांनो खचू नका, असा धीर देत शासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी असून, कोणत्याही परिस्थितीत मदत करू, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला.

सावली तालुक्यातील मुंडाळा, पाथरी, उसरपार (तुकूम), मंगरमेंढा, पालेबारसा, सायखेडा येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करताना ते बोलत होते.

पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण वर्षभराचे बजेट कोलमडले आहे. सावली तालुक्यात जवळपास ३५ गावांमध्ये ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या भागात होणारा जय श्रीराम नावाचा धान २५०० ते २७०० रुपये प्रति क्विंटलने घेतला जातो. पाच एकरांमध्ये शेतकऱ्याला एक ते सव्वालाखाचे उत्पन्न मिळते. मात्र, हे लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. शेतकऱ्यांची ही व्यथा जाणून घेण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी आठ ते दहा गावांना शनिवारी भेटी दिल्या.

सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहोत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश संपूर्ण प्रशासनाला दिले आहे. ज्वारी आणि हरभऱ्याचा पुरवठा करून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कसे सावरता येईल, हा आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी मुंडाळा येथे रामदास वरखडे, पाथरी येथे मधुकर गायकवाड, उसरपार येथे काशीनाथ चौधरी, मंगळमेंढा येथे शालिकराम निसार, पालेबारसा येथे रमेश तिजारे, तर सायखेडा येथे उद्धव टेंभुर्णे यांच्या शेतातील नुकसानग्रस्त धानाची पाहणी केली.

शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

सायखेडा येथील ७० वर्षीय शेतकरी उद्धव टेंभुर्णे यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांना नुकसान झालेल्या धान पिकाची चरडी दाखवून आपली व्यथा मांडली. संपूर्ण आयुष्यात एवढा पाऊस कधीच बघितला नाही. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. या पिकातून काहीच हाती लागणार नाही. शेतातील हलाखीची परिस्थिती पाहून झोप लागत नाही. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुक्तेश्वर मंगर, सुभाष तिवाडे, रामदास घनदाटे, राजेंद्र वाघरे, डेबूजी तिवाडे व सायखेडा येथील शेतकरी उद्धव टेंभुर्णे, आदी शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. पालकमंत्री वडेट्टीवार यांना नुकसान झालेल्या धान पिकाची चरडी दाखवून व्यथा मांडली. संपूर्ण आयुष्यात एवढा पाऊस कधीच बघितला नाही. आम्ही उद्ध्वस्त झालो. हलाखीची परिस्थिती पाहून झोप लागत नाही, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, सीडीसीसी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार परीक्षित पाटील, गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे शास्त्रज्ञ डॉ. विनोद नागदेवते, स्नेहा वेलादी, सोनाली लोखंडे उपस्थित होते.

Web Title: guardian minister vijay wadettiwar visited farmer on loss of crop due to untimely rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.