पालकमंत्री स्वत:च्या पुढाकारातून वाटप करणार ४० हजार कुटुंबांना किराणा पॉकिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:00 AM2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:44+5:30

कोरोनाचा कहर जगात सुरू आहे. तो जिल्ह्यात पोहचला नसला तरी जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला लागण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. जिल्हा प्रशासनही जिल्ह्यात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. कोरोना नावाच्या अदृश्य शत्रूविरुद्ध लढण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्व राजकीय मंडळीही आपापल्या परीने हातभार हातभार लावत आहे.

The Guardian Minister will distribute grocery pockets to 40,000 families through his own initiative | पालकमंत्री स्वत:च्या पुढाकारातून वाटप करणार ४० हजार कुटुंबांना किराणा पॉकिट

पालकमंत्री स्वत:च्या पुढाकारातून वाटप करणार ४० हजार कुटुंबांना किराणा पॉकिट

Next
ठळक मुद्देआर्थिक अडचणीतील कुटुंबांसाठी वडेट्टीवार पालकत्वाच्या भूमिकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या प्रकोपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अनेकांचा रोजगार हिरावला गेल्यामुळे अन्यधान्याची दुकाने सुरू असूनही ते खरेदी करू शकत नाही. अशा कुटंबाची काळजी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना स्वस्थ बसू देत नाही. अखेर त्यांनी शासकीय परिघाबाहेर जावून काही दानशुरांची मदत घेऊन जिल्ह्यातील तब्बल ४० हजार कुटुंबांना अत्यावश्यक किराणा वस्तंूचेपॉकेट देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी पालकच म्हणून पुढे आले आहेत.
कोरोनाचा कहर जगात सुरू आहे. तो जिल्ह्यात पोहचला नसला तरी जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला लागण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. जिल्हा प्रशासनही जिल्ह्यात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. कोरोना नावाच्या अदृश्य शत्रूविरुद्ध लढण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्व राजकीय मंडळीही आपापल्या परीने हातभार हातभार लावत आहे. बाहेर राज्यातील मंडळी, चंद्रपूर जिल्ह्यात अडकून पडले आहे. त्यांच्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थाही भोजन व्यवस्था करीत आहे. परंतु ज्यांच्याकडे दोनवेळेचे पोट भरण्यासाठी आर्थिक चणचण आहे. अनेकांकडे शिधापत्रिका नाही. यामध्ये अल्पभुदारकांसह अन्य कुटुंबाचाही समावेश आहे. त्यांची चिंता पालकमंत्री या नात्याने विजय वडेट्टीवार यांना लागणे स्वाभाविक आहे. त्यांनी शांत न बसता शासनस्तरावर पुढाकार सर्वकष पुढाकार घेतला. परंतु काही मदत शासकीय चाकोरी बाहेर जावून करणे गरजेचे असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांच्यातला एक लोकनेता जागा झाला. त्यांनी जिल्ह्यातील ४० गरजू कुटुंबांना किराणा सामानातील अत्यावश्यक वस्तू गरजूंना देण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी त्यांच्यापुढेही आर्थिक मर्यादा होती. अशातच त्यांनी काही दानशुरांकडे हा प्रस्ताव ठेवला आणि यासाठी अनेक हात पुढे आले. सुमारे दोन कोटी रुपयांचा हा बजेट आहे. यामध्ये १५ हजार पॉकीटाच्या खर्चाचा वाटा स्वत: ना. वडेट्टीवार यांनी उचलण्याचे ठरविले. पॉकेट तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ६ एप्रिलपासून प्रत्येक तालुक्यात गरजु कुटुंबांना या किराणा पॉकेटचे वाटप केले जाणार आहे.

वितरण तहसील कार्यालयामार्फत
ही सर्व किराणा धान्याची पॉकेट प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात जमा केली जाणार आहे. यामाध्यमातूनच त्याचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. यामध्ये १० किलो तांदूळ, २ किलो डाळ, १ किलो खाद्य तेल, जिरं, सावण यासारख्या अत्यावश्यक वस्तूंचा या पॉकेटात समावेश असणार आहे.
५ एप्रिलला ब्रह्मपुरीतून होणार प्रारंभ
किराणा साहित्याच्या पॉकिटाचा वाटप ४ एप्रिलपासून ब्रह्मपुरी येथून केला जाणार आहे. यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एकेक दिवस निश्चित केला असून त्या नुसार हा वाटप केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: The Guardian Minister will distribute grocery pockets to 40,000 families through his own initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.