आठ हजार विद्यार्थी घेणार पालकमंत्री संगणक प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:09 PM2018-08-03T22:09:13+5:302018-08-03T22:10:05+5:30

महाराष्ट्रातील अभिनव प्रयोग म्हणून नावलौकिकास आलेल्या पालकमंत्री संगणक प्रशिक्षण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मागील सत्रात ११९ शाळांमध्ये सात हजार ७११ मुलांना प्रशिक्षित करण्यात आले होते़ यंदा आठ हजार विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मोहिमेचा लाभ देण्यात येणार आहे़

Guardian Minister's Computer Training will take eight thousand students | आठ हजार विद्यार्थी घेणार पालकमंत्री संगणक प्रशिक्षण

आठ हजार विद्यार्थी घेणार पालकमंत्री संगणक प्रशिक्षण

Next
ठळक मुद्देदुसऱ्या टप्प्याला सुरूवात : मागील सत्रात ७ हजार ७११ विद्यार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: महाराष्ट्रातील अभिनव प्रयोग म्हणून नावलौकिकास आलेल्या पालकमंत्री संगणक प्रशिक्षण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मागील सत्रात ११९ शाळांमध्ये सात हजार ७११ मुलांना प्रशिक्षित करण्यात आले होते़ यंदा आठ हजार विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मोहिमेचा लाभ देण्यात येणार आहे़
जिल्ह्यातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या ९४२ शाळांमध्ये ३८ हजार ३०० विद्यार्थ्यांना याचा लाभ पुढील चार वर्षांत मिळणार आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी या मोहिमेची सुरुवात केली होती. गुरूवारी ज्युबिली हायस्कूलमध्ये दुसºया टप्प्याच्या संगणक वाहनाला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक)दीपेंद्र लोखंडे,शिक्षणाधिकारी (निरंतर) निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी किशोर काळे, ज्युबिली हायस्कूलचे प्राचार्य रवींद्र काळपांडे, विस्तार अधिकारी अरूण काकडे, मोरेश्वर बारसागडे, सीमएम फेलो व प्रकल्प समन्वयक प्रियंका पारले, टाटा ट्रस्टचे समन्वयक नीता निवळकर, संदीप सुखदेवे आदी उपस्थित होते. टाटा ट्रस्टच्या मदतीने सुरु झालेला हा अभिनव उपक्रम असून यामध्ये विद्या प्रतिष्ठानचादेखील सहभाग आहे.
जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या सर्व शाळा सध्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी अद्ययावत डिजिटल वर्ग निर्माण केले जात आहे. या संगणक प्रशिक्षणाने विद्यार्थ्यांच्या संगणक साक्षरतेला मदत होणार आहे. जिल्ह्यामध्ये मागील वर्षी ५ सप्टेंबरला पालकमंत्र्यांच्या हस्ते दहा बसेस जनसेवेसाठी कार्यान्वित करण्यात आल्या होत्या़ पहिल्या टप्प्यात चंद्र्रपूर, बल्लारपूर, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी, जिवती तालुक्यामध्ये ११९ शाळांच्या माध्यमातून ७ हजार ७११ मुलांना प्रशिक्षण देण्यात आले होते. आता या नव्या टप्प्यांमध्ये कोरपना आणि राजुरा या दोन तालुक्यांना यामध्ये जोडण्यात आले आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या सर्व शाळांना मोहिमेतून मदत केली जाणार आहे. पुढील वर्षभरात ८ हजार विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ४० सत्रांमध्ये प्रात्यक्षिक व अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.
बारामतीचे तज्ज्ञ देणार संगणकाचे धडे
पुढील वर्षभरात जिल्ह्यातील ८ हजार विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ४० सत्रांमध्ये प्रात्यक्षिक व अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. यासाठी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानने अतिशय प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. ग्रामीण, शहरी व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना हे तज्ज्ञ संगणाचे धडे देणार आहेत़ शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी उद्घाटनाप्रसंगी केले़ यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला़

Web Title: Guardian Minister's Computer Training will take eight thousand students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.