पालकमंत्र्यांच्या हस्ते सातारा-तुकूम रस्त्याचे लोकार्पण
By admin | Published: July 26, 2016 01:06 AM2016-07-26T01:06:06+5:302016-07-26T01:06:06+5:30
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आलेल्या....
चंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आलेल्या सातारा-तुकूम मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या रस्त्यावर दोन कोटी १८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्या अल्का आत्राम, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी.के.बालपांडे, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, सरपंच कविता मडावी आदी उपस्थित होते. राज्यमार्ग ३१८ ते कोसारा-सोईट-वरोरा-मोहर्ली-चंद्रपूर-जुनोना-गिलबिली-पोंभूर्णा-नवेगाव मोरे अशा ९ रस्त्यांचे सदर काम करण्यात आले असून दोन कोटी १८ लाख रुपये या कामावर खर्च करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रस्ते मजबूत बनविण्याचे काम सुरु असून गेल्या एक वर्षात २७२ कोटी रुपये जिल्ह्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी देण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १०० किलोमीटरची रस्त्याची कामे विशेष बाब म्हणून जिल्ह्यात मंजूर करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.