बल्लारशाह वनपरिक्षेत्र घडविणार भारत मातेचे रक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 05:00 AM2022-04-20T05:00:00+5:302022-04-20T05:00:48+5:30
कळमना, इटोली, आमडी, मानोरा, केम या पाच गावांतील ५० तरुणांची निवड करून, त्यांच्या आवडीनुसार त्यांचे सैनिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बामणी येथील मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमी येथे सेवानिवृत्त लष्कर अधिकारी एम.ए. खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिन्यांचे सैनिक प्रशिक्षण देण्यात येत आहे, तसेच परीक्षेबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे सैनिक बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : गावखेड्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत बल्लारशाह वनपरिक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यातील ५० ग्रामीण युवकांची निवड करून, त्यांच्या आवडीनुसार सैन्य व पोलीस भरतीची निवासी प्रशिक्षण, तसेच स्पर्धा परीक्षेचे धडे देण्यात येत आहे. त्यामुळे या ५० तरुणांचा सैन्यभरतीचा मार्ग सुकर झाला आहे.
वनसंवर्धन व वनसंरक्षण हेच वनविभागाचे काम नसून, वनालगत असलेल्या गावाची काळजी घेऊन गावातील लोकांना मार्गदर्शन करणे. त्यांना रोजगाराची संधी प्राप्त करून देणे. नवनवीन योजनांचा लाभ त्यांना मिळवून देणे हा आहे. याच पार्श्वभूमीवर कळमना, इटोली, आमडी, मानोरा, केम या पाच गावांतील ५० तरुणांची निवड करून, त्यांच्या आवडीनुसार त्यांचे सैनिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बामणी येथील मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमी येथे सेवानिवृत्त लष्कर अधिकारी एम.ए. खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिन्यांचे सैनिक प्रशिक्षण देण्यात येत आहे, तसेच परीक्षेबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे सैनिक बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. बल्लारशाह वन परिक्षेत्रांतर्गत त्यांच्या प्रशिक्षणाचा पूर्ण खर्च डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेमार्फत करण्यात येत आहे.
बल्लारशाह वनपरिक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावात वनसमिती कार्यरत आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी माहिती मिळत असते. त्याचप्रमाणे, बेरोजगार तरुणांची माहिती मिळताच, तत्कालीन मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना अंतर्गत आम्ही पाच गावांतील ५० तरुणांची निवड करून, त्यांना सैन्य व पोलीस भरतीचे प्रशिक्षण देत आहोत.
- संतोष थिपे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह.