इनरव्हील क्लबने स्वीकारले पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:28 AM2021-03-05T04:28:07+5:302021-03-05T04:28:07+5:30
चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने लक्ष्मीबाई केतकर समिती प्रतिष्ठान येथे राहणाऱ्या मुलींचे एक वर्षासाठी पालकत्व स्वीकारण्यात ...
चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने लक्ष्मीबाई केतकर समिती प्रतिष्ठान येथे राहणाऱ्या मुलींचे एक वर्षासाठी पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे येथील मुलींना शिक्षण घेण्यास सोईचे झाले आहे. लक्ष्मीबाई केतकर समिती प्रतिष्ठान येथे ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी येत असतात. मात्र त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने त्यांना नेहमीच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब ध्यानात घेऊन इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या सदस्यांनी प्रतिष्ठानला भेट देऊन मुलींशी संवाद साधला. यावेळी मुलींमध्ये शिक्षणाची जिद्द दिसून आली. त्यामुळे क्लबच्या सदस्यांनी सर्व मुलींना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. तसेच २१ व्या शतकात संगणकाचे ज्ञान गरजेचे असल्याने संगणक साक्षर व्हाव्यात या दृष्टिकोनातून संगणक देण्यात आला. धान्य देण्यात आले तसेच एक वर्षासाठी त्या सर्व मुलींचे पालकत्व स्वीकारले. यावेळी क्लबच्या पीडीसी डॉ. विद्या बांगडे, डिस्ट्रिक्ट ऑडिटर रमा गर्ग, क्लबच्या अध्यक्ष कल्पना गुप्ता, शाहीन शफीक, पूनम कपूर यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.