गुढीपाडवा- गडी माणसांचा दिवस

By Admin | Published: March 28, 2017 12:28 AM2017-03-28T00:28:38+5:302017-03-28T00:28:38+5:30

पूर्ण जगभर दिन-महिना वर्ष याबाबतचा व्यवहार इंग्रजी दिनदर्शीकेवर चालतो.

Gudi Padva - The Day of the Fallen | गुढीपाडवा- गडी माणसांचा दिवस

गुढीपाडवा- गडी माणसांचा दिवस

googlenewsNext

गुढीतून मिळतो संदेश : ग्रामीण भागात अनन्य साधारण महत्त्व
वसंत खेडेकर बल्लारपूर
पूर्ण जगभर दिन-महिना वर्ष याबाबतचा व्यवहार इंग्रजी दिनदर्शीकेवर चालतो. तरीही, विविध प्रांत आणि देशांचे आपापले दिवस, महिना आणि वर्ष आहेत. त्याला व्यवहाराची पूर्णत: जोड नसली तरी त्यावर बरीचशी कामें काढली व केली जातात. मराठी हिंदू संस्कृतीमध्ये नववर्ष गुढी पाडव्याचे आपले एक विशेष महत्व आहे. ग्रामीण भागात तर नव वर्षाचा प्रारंभ दिन गुढी पाडव्याला विशेष महत्व आहे. तदवतच चैत्र ते फाल्गुन या बाराही महिन्याला महत्व देण्यात आले आहे. चंद्रपुरात भरणारी महाकाली यात्रा चैत्र महिन्यातच भरते. राणी हिराईने चैत्र महिन्याचे महत्व ओळखले. तेव्हापासून चैत्र महिन्यात यात्रा भरविण्यात येत असते.
शेतीचे कामंही मराठी महिन्याच्या तारखेने, त्यावरील ऋतू दिनमानाने उरकली जातात. ग्रामीण भागात आपआपसातील देवाणघेवाण आणि शेतीविषयक व्यवहार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसालाच केली जातात. शेतकरी, शेतीच्या कामावर गडी माणस बारा महिन्याकरिता घेतात. ते गुढी पाडण्यालाच! गुढी पाडवा येण्यापूर्वीचा गडी माणसाचा शोध घेतला जातो. त्यांचेकडे जो गडी माणूस आहे, त्यालाच परत ठेवायचा असल्यास त्याचेशी तशी बोलणी केली जाते. हा करार लिखित राहात नाही, तोंडीच होतो. सारा कारभार एकमेकांच्या विश्वासावर चालतो. गडी माणूस आणि मालकाचे पटले नाही तरच नवीन गडी माणूस ठेवतात. पण, तो गुढी पाडव्या पासूनच! गुढी पाडव्याला घुगऱ्याला महत्व आहे. गुढी पाडव्याआधीच शेतातील बरीचशी पीक घेऊन धान्य घरी आलेले असतात. ते सारे धान्य त्यात ज्वारी, गहू, हरभरा, तूर, वाल, पोपट आदीचे मिसळ करुन त्यांच्या घुगऱ्या शिजविल्या जातात. शेतामध्ये आंब्याची झाडं असतातच व आंबे लागून असतात. त्याची चटणी आणि घुगऱ्या, असे नववर्षाच्या स्वागताचे ग्रामीण पदार्थ! घुगऱ्या आपआपल्या इष्टदेवतांपुढे नैवेद्य ठेवून मगच सारे जण खातात. आणि गडी माणसाला खायला देतात. साखरगाठी, गडवा, आंबा व कडूनिंबाची पानं, रंगीन कपडा या वस्तूंनी गुढी उभारली जाते. घरोघरी दारांवर आंब्याच्या पानांची तोरण लावली जातात.
गडी माणसाला सोबत घेऊन शेतीवर पूजा केली जाते. पूर्वी गडी माणसाला महिन्याला सात कुडव (एका कुडवात आठ पायली) ज्वारी, सोबत मिरची, तुळ कौरे दिल्या जाई. त्यामुळे गडी माणसाला ‘सात कुडव्या’ असे म्हटले जात असे. आता ती पद्धत बदलली आहे. नगरी ठरलेले पैसेच दिले जातात. पूर्वी कामाचे तास नसायचे असाता काम तासाने गडी माणूस करतो. पूर्वी गडी माणूस घरचा एक सदस्य मानला जाई. पाहुण्यांची ने आण कर, त्याचा मान कर व घरची इतर कामं तो करायचा. आता ती स्थिती राहिली नाही. व्यवहारीक्ता आली असे कास्तकार सांगतात पण, तरीही काही ठिकाणी अपवाद म्हणून तसे ही गडी माणसं आहेतच! आज गडी माणूस म्हणून नवीन मालकांकडे रुजू होत असलेल्या गडी माणसांना शुभेच्छा!

गुढी काय देते संदेश
गुढी उंच उभारली जाते. त्याचा अर्थ, आपले ध्येय उंच आणि मोठे असावे. साखरेची गाठी (माळ; व सोबत कडूनिंबाची उगाळी याचा अर्थ दु:खानंतर सुख येतोच हा सकारात्मक दृष्टीकोण, फूलांचा हार म्हणजे जीवन सुगंधीर करा. वस्त्र ठेवण्याचा अर्थ, आयुष्यात आपण नाती, धाग्यांप्रमाणे घट्ट जोडायला हवे, गडवा उलटा ठेवतो यातून संदेश अपाल्या ओंजळीतल दुसऱ्यांना द्या, दातृत्वाची भावना मनात ठेवा!
मराठी हिंदू महिना आणि तारखी अर्थात तिथी याचे लग्न कार्यात मोठे महत्व आहे. विवाहाचा मुहूर्त काढताना त्याचा प्रामुख्याने विचार करुन तिथी त्याप्रमाणे ठरविली जाते. मराठी वा हिंदी भाषिक हिंदुच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका बघा! त्यात चैत्र कृ. शके १९३९ (सध्या इंग्रजी वर्ष २०१७) असा उल्लेख दिसेल. मराठी आणि इंग्रजीच्या वर्षामध्ये एवढे अंतर कां? (मराठी १९३९ तर इंग्रजी २०१७) याचे उत्तर ज्योतिषीच देऊ शकतात.

Web Title: Gudi Padva - The Day of the Fallen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.