आहार व स्वच्छतेविषयी अंगणवाडीतील महिलांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:29 AM2021-09-27T04:29:34+5:302021-09-27T04:29:34+5:30
मेघा ही कृषी महाविद्यालय, गडचिरोली येथे अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. गरोदर मातेने मसाले, तिखट, आंबट व जास्त प्रमाणात ...
मेघा ही कृषी महाविद्यालय, गडचिरोली येथे अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. गरोदर मातेने मसाले, तिखट, आंबट व जास्त प्रमाणात मीठ असलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, इतर रुक्ष पदार्थ खाण्याचे टाळावे. बाळ खाली पडलेली खेळणी किंवा इतर काही वस्तू तोंडात घालते, यामुळे खालची घाण तोंडात जाते व बाळाला जुलाब होऊ लागतात. जुलाब होणाऱ्या मुलाला भरपूर पातळ पदार्थ द्यावे. भाताची कांजी, भाताची पेज, फळांचा ताजा रस, भाज्यांचे सूप असे पदार्थ द्यावे. लहान मुलांचे व कुटुंबाचे आरोग्य घरातील महिलांची जबाबदारी असते, असे मेघाने कार्यक्रमाला उपस्थित गरोदर महिलांना सांगताना आरोग्य व आहाराविषयी महत्त्व पटवून दिले. यावेळी अंगणवाडी सेविका वंदना ढुमणे, मीरा निखाडे, लता रणदिवे, सुरेखा जानवे, जोत्स्ना ढोबे, विशाल शेंडे उपस्थित होते.
260921\img-20210926-wa0026.jpg
आहार व स्वच्छतेविषयी अंगणवाडीतील महिलांना मार्गदर्शन