बाल सुरक्षा समूहातर्फे काळजी आणि संरक्षण याविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:31 AM2021-08-24T04:31:47+5:302021-08-24T04:31:47+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्टेशन प्रबंधक रामलाल सिंग, तर प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वे सुरक्षा बलचे निरीक्षक महेंद्रकुमार मिश्रा, सहायक पोलीस निरीक्षक ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्टेशन प्रबंधक रामलाल सिंग, तर प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वे सुरक्षा बलचे निरीक्षक महेंद्रकुमार मिश्रा, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद रासकर, सी. सी. आय रवी मिश्रा, हेड कॉन्स्टेबल देवानंद मंडलवार,केदार चौधरी, डेप्टी सी.टी.आय डब्ल्यू आर. ए. संतोष कुमार, लोकसंग्रह समाज सेवा संस्थेचे सहसंचालक ब्रदर एल्जिन थोमस, उमाकांत दास, संरक्षण अधिकारी प्रीती उंदीरवाडे, भास्कर ठाकूर, अमोल मोरे आदी उपस्थित होते. यावेळी रामलाल सिंग यांनी काळजी व संरक्षण आणि भेदभाव न करता संरक्षण देण्याची प्रतीज्ञा घेतली. समन्वयक भास्कर ठाकूर यांनी बाल साह्यता समूह व रेल्वे चाईल्ड लाईनकडून झालेल्या कार्याबाबत माहिती दिली. प्रीती उंदीरवाडे यांनी बालकांची सुरक्षा आणि बाल संगोपन याबाबत माहिती दिली. समन्वयक अमोल मोरे यांनी १०९८ टोल फ्री नंबरविषयी माहिती दिली. तर रामलाल सिंह, मदतीची गरज असणाऱ्या मुलांसाठी १०९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक भास्कर ठाकूर, संचालन हिमताई वांढरे तर आभार सुरेंद्र धोडरे यांनी मानले. यावेळी अतुल मडावी, विजय अमर्थराज, धर्मेंद्र मेश्राम,लक्ष्मण कोडापे, अजय देऊरघरे, कविता दोमाला, बबिता लोहकरे, इशिका बर्वे, प्रदीप वैरागडे, रेखा घोगरे, प्रणाली इंदुरकर, नक्षत्रा मुठाळ आदी उपस्थित होते.
230821\img-20210818-wa0163.jpg
ब्लॅंकेट वितरण करताना मान्यवर