ग्राहकांचे अधिकार व कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:29 AM2021-07-28T04:29:27+5:302021-07-28T04:29:27+5:30
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील नागपूर विभागीय संचालक प्राचार्य डॉ. नारायण ...
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील नागपूर विभागीय संचालक प्राचार्य डॉ. नारायण मेहरे, पुणे येथील आत्मनिर्भर या एनजीओचे संचालक ॲड. मनीष ढेंगळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
प्राचार्य नारायण मेहरे म्हणाले, प्रत्येक व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत ग्राहक असतो. प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायद्याविषयी जागरूक व सतर्क असावे आणि इतरांना जागरूक करावे. पुणे येथील व्ही. आत्मनिर्भर एनजीओचे संचालक ॲड. मनीष ढेंगळे यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ मध्ये २०२० पर्यंत झालेले बदल यावर सविस्तर चर्चा केली. प्राचार्य उमाटे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. विजय टोंगे यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. बंडू जांभूळकर यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. उत्तम घोसरे यांनी केले. समन्वयक डॉ. सुहास तेलंग, प्रा. मोहित सावे, डॉ. सुधीर आष्टुनकर, डॉ. ज्योती राखुंडे, डॉ. प्रकाश तितरे, डॉ. रमेश पारेलवार, डॉ.यशवंत घुमे, डॉ. गजानन खामनकर, डॉ. जयवंत काकडे, प्रा. संगीता बांबोळे, प्रा. अमोल ठाकरे यांनी सहकार्य केले.