परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वेळेच्या सदुपयोगाबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:26 AM2021-04-06T04:26:43+5:302021-04-06T04:26:43+5:30

बल्लारपूर : परीक्षेची तयारी, अभ्यास त्याचप्रमाणे पेपर सोडविताना वेळेचा सदुपयोग व त्याचे नियोजन कसे हवे, याबाबत दहावीच्या विद्यार्थ्यांना येथे ...

Guidance to the examinees on the best use of time | परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वेळेच्या सदुपयोगाबाबत मार्गदर्शन

परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वेळेच्या सदुपयोगाबाबत मार्गदर्शन

Next

बल्लारपूर : परीक्षेची तयारी, अभ्यास त्याचप्रमाणे पेपर सोडविताना वेळेचा सदुपयोग व त्याचे नियोजन कसे हवे, याबाबत दहावीच्या विद्यार्थ्यांना येथे तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

येथील हेल्पिंग हॅन्ड बल्लारपूर हिरकणीने या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन बामणी येथील बीआयटीच्या प्रांगणात केले होते. कोरोना संकटात परीक्षार्थींपुढे अनेक समस्या उभ्या झाल्या आहेत. त्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना यात सुरेखा पांडे, बीआयटीचे प्राचार्य श्रीकांत गोजे, डॉक्टर सुमंत टेकाडे, प्रवीण विघ्नेश्वर, बीआयटीचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय वासाडे यांनी मार्गदर्शन करीत परीक्षेला पूर्ण तयारी आणि आत्मविश्वासाने सामोरे जा, असा मोलाचा सल्ला दिला. या कार्यक्रमात हिरकणीचे अध्यक्ष डॉक्टर मंजुषा कल्लुरवार, अर्पिता कुकरेजा, संजना मुलचंदानी, स्नेहा भाटिया, सिमरन सय्यद, कीर्ती चावडा, स्नेहा मंगानी, योजना गंगशेट्टीवार, ललिता हलदर, अर्चना बुटले, सपना जैन, गीता यामसीनवार, सिमरन मंगानी, गंगा जोरा, रोहिणी नंदीगमवार, कोमल पोफळी, निकिता मुलचंदानी, शीतल पामपट्टीवार आदींची उपस्थिती होती.

Web Title: Guidance to the examinees on the best use of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.