कृषी संजीवनी सप्ताहातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:18 AM2021-06-30T04:18:40+5:302021-06-30T04:18:40+5:30
मूल : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत मूल तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन २१ जून ते १ जुलै रोजी ...
मूल : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत मूल तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन २१ जून ते १ जुलै रोजी करण्यात आले. या सप्ताहात कृषी बी. प्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, रुंद वरंबा, सरी, बी. बी. एफ. लागवड, एक गाव एक वाण उपक्रम, विकेल ते पिकेल फळबाग लागवड, तंत्रज्ञान सहभाग पिकावरील कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना आदींबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
रुंद वरंभा, सरी बीबीएफ लागवड पद्धतीने सोयाबीन पिकाची बेंबाळ येथील धनंजय उमरगुंडावार यांच्या शेतात पीक प्रत्यक्षिक सादर करण्यात आले. उसराला, भादुर्णा, पडझरी, रत्नापूर या परिसरात कृषी सहायक शिल्पा मंत्रीवार यांनी शेतकऱ्यांच्या सभा आणि प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन करीत आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी शेतकऱ्यांना रुंद वरंभा सरी लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे यांनी मार्गदर्शन केले. तालुक्यातील भेजगाव येथील विजय लोनबले यांच्या शेतातील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत सधन आंबा लागवडीची पाहणी करण्यात आली. सप्ताह यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी दीप्तांशी तिजारे, पर्यवेक्षक प्रकाश पराते, मंडळ अधिकारी रविशंकर उईके आदी परिश्रम घेत आहेत.