इंजिनिअरिंग, मेडिकलला जाण्याऱ्यांसाठी मार्गदर्शन

By admin | Published: April 14, 2017 12:49 AM2017-04-14T00:49:37+5:302017-04-14T00:49:37+5:30

लोकमत बालविकास मंचने आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Guidance for going to the engineering, medical | इंजिनिअरिंग, मेडिकलला जाण्याऱ्यांसाठी मार्गदर्शन

इंजिनिअरिंग, मेडिकलला जाण्याऱ्यांसाठी मार्गदर्शन

Next

लोकमत व गायडन्स पॉर्इंटतर्फे उद्या विद्यार्थ्यांसाठी सेमिनार व शिष्यवृत्ती परीक्षा
चंद्रपूर : लोकमत बालविकास मंचने आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याप्रमाणे यावेळी लोकमत व गायडन्स पार्इंटद्वारे सेमिनार व शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन १५ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. हा सेमिनार लक्ष्मीनारायण मंदिर हॉल, लोकमान्य टिळक शाळेजवळ, मेन रोड, चंद्रपूर येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
यामध्ये पुणे येथील प्रसिद्ध वक्ते डॉ. रवींद्र क्षीरसागर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या सेमिनारमध्ये देशातील प्रमुख इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती देण्यात येणार आहे. त्याच बरोबर जेईई मेन, जेईई अ‍ॅडव्हान्स व ‘नीट’ परीक्षेचे बदलते स्वरूप या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जेईई मेन, अ‍ॅडव्हान्स व नीटची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी, त्यात पालकांची भूमिका किती महत्त्वपूर्ण आहे, यावर सविस्तर माहिती दिली जाणार आहे. २००८मध्ये डॉ. क्षीरसागर यांना यंग सायंटिस्ट अवॉर्ड, नॅशनल अ‍ॅकेडमी आॅफ सायन्सेस इंडियाद्वारे इनोव्हेटिंव्ह टिचिंग अवॉर्डने पुरस्कृत करण्यात आले आहे. ते ११वी टेस्ट बुक आॅफ बायोलॉजी को-आॅर्डिनेकर व आॅथर आहेत. ‘बोर्ड आॅफ स्टडीज इन बायोलॉजी’चे सदस्यसुद्धा आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Guidance for going to the engineering, medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.