संरक्षा परिसंवादात रेल्वे अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:25 AM2021-01-22T04:25:31+5:302021-01-22T04:25:31+5:30
बल्लारपूर : रेल्वे सेफ्टी विभाग नागपूर मंडळच्या वतीने येथील बल्लारशाह रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये रेल्वे इंजीनचे ड्रायव्हर व कर्मचाऱ्यांसाठी रेलगाडीचे संचालन ...
बल्लारपूर : रेल्वे सेफ्टी विभाग नागपूर मंडळच्या वतीने येथील बल्लारशाह रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये रेल्वे इंजीनचे ड्रायव्हर व कर्मचाऱ्यांसाठी रेलगाडीचे संचालन कसे करावे, यावर संरक्षा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
मंडळ रेल प्रबंधक नागपूरचे (मध्य रेल) रिचा खरे यांच्या नेतृत्वात व वरिष्ठ मंडळ संरक्षा अधिकारी अरविंद दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिसंवादाची अध्यक्षता स्टेशन प्रबंधक रामलाल सिंग यांनी केली. यावेळी एडीएसओ कमलेश कुमार, एओएम पी.बी.राव (जी.), एन.ए. नागदेवे यांनी उपस्थित रेल्वे इंजीन चालकांना फ्लॅट टायरचे कारण, ते थांबविण्यासाठी परिचालन कर्मचाऱ्यांचे कर्तव्य, सी. अँड. डब्ल्यू विभागाचे कर्तव्य काय आहे, कार्यस्थळावर कशा प्रकारे सावधानी बाळगली पाहिजे, रेल आणि वेल्डोची यूएसएफडी, टेस्टिंग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
यावेळी अन्नम वेंकटेश, एम. वेंकटेश, यू.के. दास, संरक्षा विभागाचे सल्लागार एच.एस. रघुवंशी, संजय गोपाले, एन.एल. जिद्देवार, आर.पी. शर्मा यांनी परिसंवादात भाग घेतला. संचालन रघुवंशी यांनी केले व आभार प्रदर्शन अन्नम वेंकटेश यांनी केले.