कृषी विभागातर्फे महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:48+5:302021-06-19T04:19:48+5:30
गोवरी : ज्ञानाचा महिला शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी नवीन प्रशासकीय भवन राजुरा येथे ट्रायकोग्रामा निर्माण करण्याची पद्धत या विषयावर ...
गोवरी : ज्ञानाचा महिला शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी नवीन प्रशासकीय भवन राजुरा येथे ट्रायकोग्रामा निर्माण करण्याची पद्धत या विषयावर उपविभागातील शेतकरी महिला समूह गटाचे प्रशिक्षण पार पडले.
सदर प्रशिक्षणादरम्यान कीटकशास्त्र विभागाचे डॉ. हरीश सवाई यांनी ट्रायकोग्रामा एक परोपजीवी गांधीलमाशी वर्गातील एक अतिशय लहान कीटक असून, खरीप व रब्बी हंगामातील पिके व भाजीपाला वर्गीय पिकावरील शत्रुकिडीच्या अळ्यांचा शोध घेऊन नाश करून उपजीविका करतो. यासाठी धान्यात होणारा कॉर्सेरा नावाच्या किडीची जोपासना करून त्यांच्या अंड्यावर ट्रायकोग्रामा मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात. तसेच याद्वारे ट्रायकोकार्ड तयार करण्याची पद्धत व त्याचा वापर आणि संगोपन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. यावेळी महिला शेतकऱ्यांना कृषिसंजीवनी-२०२१ वितरित करण्यात आली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी जी. डी. मोरे, तालुका कृषी अधिकारी व्ही. के. मकपल्ले, दिव्यांशू सहारे, आर. जी. ढमाळे, के. व्ही. चंदनबटवे उपस्थित होते.