सिंदेवाहीत कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:54 AM2018-06-15T00:54:38+5:302018-06-15T00:54:38+5:30
पूर्वविदर्भ विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची ६८ वी खरीप २०१८ समितीची सभा सिंदेवाही येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या सभागृहात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही. एम. भाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : पूर्वविदर्भ विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची ६८ वी खरीप २०१८ समितीची सभा सिंदेवाही येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या सभागृहात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही. एम. भाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेला विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर, संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे, नागपूर विभागीय कृषी सहसंचालक डॉ. एन. टी. सिसोदिया, कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई, उद्यान विद्या प्रमुख डॉ. बी. एन. गणवीर, कृषी अर्थशास्त्र, डॉ. व्ही. एस. टेकाडे, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र प्रमुख डॉ. ए. एस. इंगोले उपस्थित होते. सभेची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते मालार्पण व दीप प्रज्वलन करुन झाली. सर्वप्रथम विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. पी. व्ही. शेंडे यांनी प्रास्ताविकात पूर्वविदर्भ विभागीय धान पिकावर मागील वर्षीपर्यंत झालेल्या संशोधनाची विषयनिहाय माहिती दिली.
संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार कृषी संशोधन केंद्र- कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र मिळून करावा, असे सूचविले. कुलगुरु डॉ. व्ही. एम. भाले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यापीठनिर्मित तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे विस्तार व प्रसार होण्यासाठी कृषी विभाग व संलग्न विभाग आणि विद्यापीठ यांनी एकत्रीतपणे काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. तसेच पूर्व विदर्भात धान पिकाचे पेरीव पद्धतीचे अवलंबन करुन रब्बी हंगामामध्ये रब्बी ज्वारी घेण्याचे आवाहन केले. जेणेकरुन पशुधनासाठी ज्वारीसोबत चाऱ्याचे उद्दिष्ट साध्य करु शकतील. दुबार पीक घेतल्याने शेतकºयांच्या उत्पादनात वाढ होईल, याबाबत मार्गदर्शन केले. कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. अरविंद तुपे यांनी मान्सून २०१८ पूर्वानुमान व वाटचालीविषयी मार्गदर्शन केले.
या सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि आत्मा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया यांनी आपापल्या विभागाचे कार्याचे अहवाल व खरीप नियोजनाचे सादरीकरण केले. सभेचे संचालन प्रा. डॉ. सोनाली लोखंडे तर आभार प्रा. पी. के. राठोड यांनी मानले. या खरीप समितीच्या सभेला कृषी विद्यापीठाचे विभाग प्रमुख व वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन केंद्राचे केंद्रप्रमुख आदी उपस्थित होते.