ग्रामगीता घराघरात पाेहचविण्यांचे कार्य गुरूदेव सेवा मंडळाने करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:25 AM2021-02-15T04:25:03+5:302021-02-15T04:25:03+5:30

बल्लारपूर : येथील श्री गुरूदेव सेवा मंडळ, तालुका बल्लारपूरच्या वतीने स्थानिक विवेकानंद वॉर्ड, हनुमान मंदिर परिसरात राष्टसंत तुकडाेजी महाराज ...

Gurudev Seva Mandal should deliver the Gram Gita to every household | ग्रामगीता घराघरात पाेहचविण्यांचे कार्य गुरूदेव सेवा मंडळाने करावे

ग्रामगीता घराघरात पाेहचविण्यांचे कार्य गुरूदेव सेवा मंडळाने करावे

Next

बल्लारपूर : येथील श्री गुरूदेव सेवा मंडळ, तालुका बल्लारपूरच्या वतीने स्थानिक विवेकानंद वॉर्ड, हनुमान मंदिर परिसरात राष्टसंत तुकडाेजी महाराज व संत गाडगेबाबा यांचा पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामगीताचार्य डाखरे महाराज यांचे प्रबाेधनात्मक कीर्तनाने राष्टसंतांच्या कार्याची महती विशद केली. दरम्यान सामाजिक, राजकीय व समाज सेवा कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे तालुका अध्यक्ष भास्कर डांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य विठ्ठलराव डाखरे महाराज, विजय चिताडे, जयराम नन्नावरे, सत्कारमूर्ती नगरपालिकेचे नियोजन सभापती व गुरूदेव सेवा मंडळाचे आधारस्तंभ अरुण वाघमारे, कल्पना वाघमारे, गाडगेबाबा वाचनालयाचे व श्री नृसिंह नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार, माजी नगरसेवक वर्षा सुंचुवार, गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक व विसापूर येथील उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांची उपस्थिती हाेती.

ग्रामगीताचार्य डाखरे महाराज म्हणाले, राष्टसंत तुकडाेजी महाराज यांचे कार्य समस्त समाजबांधवांना मानवी जीवन सुकर करणारे आहे. त्यांची ग्रामगीता ज्ञान देणारी आहे. मानवाच्या कल्याणासाठी ग्रामगीता उपयुक्त आहे. कीर्तन व भजनाच्या माध्यमातून गुरूदेव भक्त ग्रामगीता आत्मसात करत आहेत. मात्र त्यावर आधारित आचरण करत नाही. आता मात्र राष्टसंत तुकडाेजी महाराज यांची ग्रामगीता घराघरात पाेहोचविण्यांचे कार्य गुरूदेव सेवा मंडळाने करण्याची गरज आहे, असे कीर्तनाच्या माध्यमातून सांगितले. तत्पूर्वी राष्टसंत तुकडाेजी महाराज यांच्या पुण्यतिथी महाेत्सवाचे औचित्य साधून पालखी मिरवणूक काढण्यात आली.

बल्लारपूर तालुका गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष भास्कर डांगे, अरुणा डांगे, दीपक मेश्राम, रामभाऊ पेटकर, भय्याजी त्र्यंबके यांनी ओम शिव महिला भजन मंडळ, जगन्नाथ बाबा महिला भजन मंडळ व श्री गुरूदेव सेवा महिला भजन मंडळ यांना गुरूदेव सेवा कार्यातील याेगदानाबद्दल प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यांचा झाला सत्कार

बल्लारपूर नगरपालिकेचे नियोजन सभापती अरुण वाघमारे व त्यांच्या पत्नी कल्पना वाघमारे, समाजसेवक श्रीनिवास सुंचूवार व त्यांच्या पत्नी वर्षा सुंचूवार, विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, हभप विठ्ठलराव डाखरे महाराज यांचा गुरूदेव सेवा मंडळाच्या पदाधिकार्यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण सत्कार केला.

Web Title: Gurudev Seva Mandal should deliver the Gram Gita to every household

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.