बुकिंगविनाच जिप्सीने केली फुकटची सफारी; ताडोबा प्रकल्पाच्या नाईट सफारीतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 02:34 PM2023-04-04T14:34:35+5:302023-04-04T14:35:35+5:30

वनाधिकारी कारवाई करणार का ?

Gypsy offers free safari without booking; Shocking types of Tadoba Tiger projects night safari | बुकिंगविनाच जिप्सीने केली फुकटची सफारी; ताडोबा प्रकल्पाच्या नाईट सफारीतील धक्कादायक प्रकार

बुकिंगविनाच जिप्सीने केली फुकटची सफारी; ताडोबा प्रकल्पाच्या नाईट सफारीतील धक्कादायक प्रकार

googlenewsNext

पळसगाव (पिपर्डा) : एका वाहनात चार पर्यटक तसेच वाहन चालक व गाईड सोबत असणे अनिवार्य असताना १८ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७.३५ वाजता एका जिप्सी चालक-मालकाने ऑनलाइन किंवा स्पॉट बुकिंग न करता अथवा शुल्क न भरता ताडोबा प्रकल्पातील पळगाव क्षेत्रात अवैध फुकट सफारी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

वनकुटीवर उपस्थित वन मजुरांनी जिप्सी जंगलात गेल्याची व परत आल्याची आवक-जावक रजिस्टरवर नोंद केल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. सफारीसाठी दूरवरून पर्यटक येतात आणि शुल्क भरून सफारी करतात, तर दुसरीकडे एका जिप्सी चालकास शुल्क न भरता आत जाऊ देण्यात आले. रात्रीला पर्यटन क्षेत्रात अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असाही प्रश्न निर्माण झाला. ताडोबा वनपर्यटन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिप्सी चालकास व जिप्सीला तत्काळ ताडोबा वन पर्यटन क्षेत्रातून कायमस्वरूपी निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जिप्सी अवैधरीत्या गेली असेल तर चौकशी करण्यात येईल. दोषी आढळल्यास संबंधित जिप्सी चालक- मालकावर दंडात्मक कारवाई करू.

- बी. सी. येळे, सहायक वनसंरक्षक (जकास), ताडोबा बफर, चंद्रपूर

Web Title: Gypsy offers free safari without booking; Shocking types of Tadoba Tiger projects night safari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.