मूल शहरात डुकरांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:25 AM2021-03-07T04:25:31+5:302021-03-07T04:25:31+5:30
आरोग्य धोक्यात : नगरपालिकेचे दुर्लक्ष मूल: शहर स्वच्छ स्पर्धेत मूल नगरपालिका नेहमीच भाग घेत असते, अनेकदा पुरस्कारही मिळाले. मात्र ...
आरोग्य धोक्यात : नगरपालिकेचे दुर्लक्ष
मूल: शहर स्वच्छ स्पर्धेत मूल नगरपालिका नेहमीच भाग घेत असते, अनेकदा पुरस्कारही मिळाले. मात्र डुकरांचा हैदोस होत असतानाही त्याकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
१७ सदस्य असलेल्या नगरपालिकेत नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांच्या पुढाकारातून मूल शहर स्वच्छ स्पर्धेत मूल नगरपालिका दरवर्षी हिरीरीने भाग घेत आहे. यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक आणि विद्यमान मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी प्रयत्न करून पुरस्कारही पटकाविला. मात्र मूल शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्यात मूल नगरपालिका पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी दोन वर्षापूर्वी नांदेड येथील डुक्कर पकडणाऱ्या पथकाला पाचारण करून शेकडो डुकरांना पकडून त्यांची रवानगी करण्यात आली होती, तेव्हा डुकरांच्या त्रासातून नागरिक मुक्त झाले होते. परंतु सध्या डुकरांमुळे नागरिकांना नाहक त्रास होत असतानाही मूल नगरपालिका प्रशासन व पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्याप्रती तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.