ताण आणि औषधांच्या माऱ्याने गेले डोक्यावरचे केस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:58 AM2021-09-02T04:58:45+5:302021-09-02T04:58:45+5:30
बॉक्स हे करा आजारातून बरे झाल्यानंतर रुग्णांनी सकस आहार घेणे गरजेचे आहे. डोक्यात कोंडा झाला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ...
बॉक्स
हे करा
आजारातून बरे झाल्यानंतर रुग्णांनी सकस आहार घेणे गरजेचे आहे. डोक्यात कोंडा झाला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच शाम्पूचा वापर करावा. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकस आहारासोबतच पुरेशी झोपही घेणे गरजेचे आहे.
डस्ट झाल्यास शाम्पू, हेअर ऑईलचा नियमित वापर करणे गरजेचे आहे.
बॉक्स
कोविडनंतर तीन महिन्यांनी गळू लागतात केस
आजारादरम्यान विविध औषधांचा मारा आणि त्यामुळे येणार ताण यामुळे शरीरात विविध बदल घडू लागतात. त्यामुळे आजार होऊन गेल्यानंतर तीन महिन्यानंतर केस गळण्यास सुरू होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली.
बॉक्स
तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानंतरच करा घरगुती उपाय
आजारातून बरे झाल्यानंतर केस गळण्याचे प्रमाण वाढू लागल्याने अनेक जण तणावात येतात. त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण आणखी वाढू लागते. यापासून बचावासाठी बहुतांश लोक इतरांच्या सल्ल्याने विविध घरगुती उपाय करण्यास सुरुवात करतात. मात्र काहींना त्याचे दुष्परिणामही दिसून लागतात. असे होऊ नये म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घरगुती उपाय करावा. जेणेकरून संभाव्य धोका टाळणे शक्य होईल.
कोट