शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना अर्ध्या किमीची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:10 AM2017-10-08T01:10:22+5:302017-10-08T01:11:17+5:30
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच आजारी पडली असून पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया ......
फारूख शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच आजारी पडली असून पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर शौचालयासाठी अर्ध्या किमीची पायपीट करावी लागत आहे.
जिवती तालुक्यातील पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. यात निकिता वाघमारे, पाटण, पार्वता सिडाम, लिंगुबाई मडावी रा. फुलारा, बिलोकर शेख रा. जैमनुर, वंदना लाहोर रा. हातोला, रंजना पांचाळ रा. गोलेगाव, साजीदा शेख रा. पाटण, लिला चव्हाण रा. पालडाहे, पूजा गुंडले रा. कोलांडी, रेखा मुंडे रा. शेणगाव या दहा महिलांवर कुटुंब नियोजन अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पाटणमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्यात पाटण येथील आरोग्य केंद्रात शौचालय असूनही ते चोकअप असल्याने शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना अर्धा किमी हातात डब्बा घेऊन पायी जाण्याची पाळी आली आहे. याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष झाले आहे. पाण्यासाठी नळयोजना आहे. परंतु टाकी फुटून असल्याने पाणीही मिळणे कठीण झाले आहे. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाºयांचे एक पद रिक्त असून सफाईगार, परिचारिका यांचीही पदे रिक्त आहे. यावर्षीचा उत्कृष्ठ कुटुंब नियोजनाचा पहिला पारितोषिक याच आरोग्य केंद्राला मिळाला आहे, हे विशेष.
शस्त्रक्रिया झाल्यावर अर्धा किमी पायदळ शौचालयाला जावे लागत असल्याने महिलांना फार त्रास होत आहे.
याशिवाय सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला सरकारच्याच आरोग्य केंद्राने वासनात गुंडाळले आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देऊन नवीन शौचालय बांधण्याची गरज आहे.
कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यावर आरोग्य केंद्रातच त्या दिवशी भरती राहावे लागते. त्यातही शौचालय नसल्याने अर्धा किमी पायदळ जाणे खरच नरक यातनाच आहे.
- साजिदा शेख, रुग्ण महिला.
वारंवार शौचालयासंदर्भात वैद्यकीय अधिकाºयांना सूचना दिली. मात्र परिस्थिती जैसे थेच आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे.
- रंजना पवार,
पंचायत समिती सदस्य,
जिवती